शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डेअरीसाठी ऊर्जेच्या पुनर्वापराचे तंत्र विकसित

By admin | Updated: June 24, 2017 20:44 IST

प्रा. पिसे यांचे संशोधन : शीतकरणामध्ये ५० टक्के विजेची बचत

संतोष मिठारी ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केआयटी कॉलेजमधील मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. एम. पिसे यांनी दूध शीतकरणातील ऊर्जेच्या पुनर्वापराचे तंत्र (हीट एक्स्चेंजर) विकसित केले आहे. यामुळे दूध शीतकरणासाठी लागणाऱ्या विजेची ५० टक्के बचत होणार आहे. दूध शीतकरणासाठी सध्या ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रामध्ये ‘बल्क मिल्क कूलर’ हे शीतकरणीय यंत्र वापरले जाते. त्या ठिकाणी थंड झालेले दूध संघामध्ये पुढील प्रक्रियेसाठी टँकरने आणले जाते. ग्रामीण भागातील संकलन केंद्रामध्ये गरजेनुसार एक हजार ते पाच हजार लीटर क्षमतेचे मिल्क कूलर्स वापरले जातात. थंड केलेले दूध संघात पाठविल्यानंतर, शीतकरण केंद्रातील दूध थंड करण्यासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे, दूध थंड करणारा टँक, दूध संकलन केलेली जागा ही पुढील वापरापूर्वी गरम पाण्याने स्वच्छ करणे गरजेचे असते. यासाठी लागणारे पाणी गरम करण्यासाठी सध्या व्यावसायिक गॅस गिझर अथवा विद्युत हिटर्सचा वापर केला जातो. ३५ अंश सेल्सिअस तापमानापासून ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत १००० लीटर दूध थंड करण्यासाठी, सुमारे १८ युनिट्स इतकी वीज लागते. याशिवाय दुधाची भांडी, इतर उपकरणे स्वच्छ, निर्जंतुक करण्याकरिता पुन्हा तेवढीच वीज लागते.प्रा. पिसे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मोठे दूध प्रकल्प आणि विविध दूध शीतकरण केंद्रांना भेटी देऊन या गोष्टीचा अभ्यास केला. यातील संशोधनातून त्यांनी ‘हीट एक्स्चेंजर’चा उपाय शोधला. या हीट एक्स्चेंजरमुळे कोणताही वाढीव खर्च न करता, एक हजार लीटर दूध शीतकरणाच्या प्रक्रियेमध्ये ६० अंश तापमानाचे ३६० लीटर इतके गरम पाणी तयार होते. या संशोधनातून विद्युत ऊर्जेची ५० टक्क्यांनी बचत होते. दूध प्रक्रिया खर्च कमी होतो. उपयुक्ततेवर शिक्कामोर्तबया संशोधनासाठी ‘नाबार्ड’ने रुरल इनोव्हेटिव्ह फंड योजनेंतर्गत ८ लाख ७५ हजारांचा निधी दिला होता. संशोधन पूर्ण झाल्यानंतर, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि राजारामबापू पाटील सहकारी दूध संघातील (कृष्णा) तंत्रकुशल अभियंते आणि नाबार्डच्या तांत्रिक गटाने ‘केआयटी’मध्ये येऊन, या संशोधनाची सखोल पाहणी करून उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब केले आहे.- प्रा. एस. एम. पिसे प्रा. पिसे हे मूळचे दानोळी (ता. शिरोळ) येथील आहेत. त्यांनी ‘हीट एक्स्चेंजर’ यावर पीएच.डी.चे संशोधन केले. त्यांनी ‘इन्व्हेस्टिगेशन आॅफ वेस्ट हीट रिकव्हरी फ्रॉम रेफ्रिजरेशन सीस्टिम’ हा शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर केला.