घड्याळ चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:05 IST2020-01-25T15:04:31+5:302020-01-25T15:05:28+5:30
संभाजीनगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनी येथे लेडीज घड्याळ चोरुन नेलेप्रकरणी मोलकरणीला जुनाराजवाडा पोलीसांनी अटक केली. संशयित शीतल आनंदा चव्हाण (रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. २५ फेब्रुवारी ते ३१ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत चोरीचा प्रकार घडला.

घड्याळ चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक
कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनी येथे लेडीज घड्याळ चोरुन नेलेप्रकरणी मोलकरणीला जुनाराजवाडा पोलीसांनी अटक केली. संशयित शीतल आनंदा चव्हाण (रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. २५ फेब्रुवारी ते ३१ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत चोरीचा प्रकार घडला.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शुभांगी मनोज गायकवाड (वय २८ रा. ड्रायव्हर कॉलनी, संभाजीनगर परिसर) यांच्या घरी संशयित मोलकरीण चव्हाण ही काम करत होती. कपाटात ठेवलेले त्यांचे ९ हजार रुपये किंमतीचे घड्याळ चोरीला गेले होते.
त्यांनी मोलकरणीवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने चोरी केल्याची कबुली दिल्याने शुक्रवारी अटक करण्यात आली. सुमारे नऊ महिन्यानंतर चोरीचा उलगडा झाला. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.