शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

नियतीने कॉन्स्टेबल दिग्विजयचा संसार अर्ध्यातच मोडला; भुयेवाडी पंचक्रोशीत हळहळ : तिशीतच हदयविकाराचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर : वडिलांनी आयुष्यभर खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करून कुटुंब घडविले. आता मुलगा मुंबई पोलीस दलात नोकरीला लागल्याने ...

कोल्हापूर : वडिलांनी आयुष्यभर खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करून कुटुंब घडविले. आता मुलगा मुंबई पोलीस दलात नोकरीला लागल्याने पांग फिटला असे त्यांना वाटले होते; परंतु कुटुंबाची बसलेली घडी नियतीला बघवली नाही. त्यांचा तरणाताठा मुलगा दिग्विजय हिंदुराव तळेकर (वय ३१) याचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. छातीत कळ आल्याचे निमित्त झाले आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दिग्विजय आज, बुधवारी ड्यूटीवर हजर होणार होता; परंतु क्रूर नियतीने त्याला जणू आपल्या ड्यूटीवरच नेले.

एका क्षणात होत्याचे नव्हते होते म्हणजे काय होते याचाच अनुभव भुयेवाडी (ता. करवीर) येथील तळेकर कुटुंबीय घेत आहेत. दिग्विजयच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांचा त्याच्या मृत्यूवर विश्वासच बसला नाही. तळेकर हे अत्यंत सामान्य कुटुंब. शेती जेमतेमच. वडिलांनी चालक म्हणून नोकरी करून त्याला शिक्षण दिले. दिग्विजय एकुलता मुलगा. तो उत्तम गाणी म्हणायचा. ‘माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तीरी’ हा त्याचा अत्यंत आवडीचा अभंग. तो हा अभंग गाऊ लागला की लोकही तल्लीन होऊन जात. पोलीस खात्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे गाणे हमखास असायचे. प्रकृतीनेही चांगला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तो मुंबई पोलीस दलात भरती झाला. त्यानंतर गेल्या ७ जूनला लग्न झाले. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्यामुळे घरात कमालीचे आनंदाचे वातावरण होते. दोनच दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता आणि पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तो जागा झाला. घशात खवखवही होत होती. त्यानंतर उलटी झाल्याने थोडे बरे वाटले; परंतु तोपर्यंतच तो खाली कोसळला. तातडीने त्याला सीपीआरला हलविले; परंतु सगळेच संपले होते. त्याच्या निधनानिमित्त गावाने व्यवहार बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली.

कोरोना लस घेतल्यानंतर...

तो पोलीस दलात असल्याने दहा दिवसांपूर्वी त्याने कोरोना लस घेतली होती. त्यानंतर दोन दिवस त्याला भोवळ येत होती. दंडही दुखत होता; परंतु त्यानंतर त्याने ड्यूटी केली व प्रकृतीची तक्रार नसल्याने सुट्टीवर गावी आला. शवविच्छेदनानंतर त्याचा व्हिसेरा मात्र राखून ठेवण्यात आला आहे.

(फोटो : २३०२२०२१-कोल-दिग्विजय तळेकर-निधन)