शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाची उघडीप, तरी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; ५८ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:36 IST

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस: चौदा मार्ग पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात जोरदार कोसळत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, वारणातून १३ हजार ७७४ तर दूधगंगेतून १४ हजार १८७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांंच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी ३४ फुटांपर्यंत पोहोचली असून तिथे इशारा (३९ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे.मंगळवारच्या तुलनेत कोल्हापुरात पावसाचा जोर कमी असला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. धरण क्षेत्रात सरासरी १५० मिलीमीटर पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ‘वारणा’, ‘दूधगंगा’ मधून विसर्ग वाढवला आहे. राधानगरी धरण ६७ टक्के भरले असून वारणा धरण ६४ टक्के भरले आहे. नद्यांची पातळीत वाढ होत असून पंचगंगा नदीची पातळी ३४ फुटांपर्यंंत पोहोचली आहे. पाणी पात्राबाहेर पसरू लागले आहे.

एस. टी.च्या फेऱ्या विस्कळीतजिल्ह्यातील ५८ बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका एस. टी. वाहतुकीला बसला असून पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागत आहे.चौदा मार्ग पाण्याखालीजिल्ह्यातील २४ राज्य मार्गांपैकी ५ मार्गावर पाणी आल्याने बंद आहे. त्याचबरोबर ९ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत.

पडझडीत १३.६२ लाखांचे नुकसानजिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ४४ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये १३ लाख ६२ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.