समरजित घाटगे यांची युतीची उमेदवारी जाहीर करा : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:23 IST2019-06-13T15:18:52+5:302019-06-13T15:23:23+5:30
कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्यानी विजयी करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल येथे बोलताना दिली.

समरजित घाटगे यांची युतीची उमेदवारी जाहीर करा : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्यानी विजयी करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल येथे बोलताना दिली.
विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण समारंभात ते बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यास प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे.
समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जँगी शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि अण्णासाहेब जोल्ले यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला..