पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील विशेष सेवा पदकाने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:00 PM2019-08-17T12:00:52+5:302019-08-17T12:04:06+5:30

मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन दशरथ पाटील यांना ह्यविशेष सेवा पदकाह्णने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गडचिरोली येथे उल्लेखनीय व खडतर कार्य बजावल्याबद्दल पोलीस प्रशासनाकडून त्यांना स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते.

Deputy Superintendent of Police Sachin Patil honored with Special Service Medal | पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील विशेष सेवा पदकाने सन्मानित

मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विशेष सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

Next
ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील विशेष सेवा पदकाने सन्मानितदीपक केसरकरांच्या हस्ते गौरव : गडचिरोलीतील कामगिरीची दखल

मालवण : मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन दशरथ पाटील यांना ह्यविशेष सेवा पदकाह्णने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गडचिरोली येथे उल्लेखनीय व खडतर कार्य बजावल्याबद्दल पोलीस प्रशासनाकडून त्यांना स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते.

मालवण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवा बजावणाऱ्या सचिन पाटील यांची १५ आॅक्टोबर २०१३ रोजी भरती झाली. पाटील हे करवीर (कोल्हापूर) तालुक्यातील विरवडे-खालसा या गावातील असून त्यांचे इंग्रजी कला शाखेतून पदवीधर शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी दिलेल्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पाचवा क्रमांक पटकावला.

पाटील हे पोलीस सेवेत १५ आॅक्टोबर २०१३ रोजी भरती झाले. १२ आॅगस्ट २०१४ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना आॅगस्ट २०१४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील अशा भामरागड तालुक्यात नियुक्ती करण्यात आली. यावेळी नक्षलवाद्यांसोबात तीनवेळा चकमक उडाली. त्यात दोन नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण घडवून आणले. गडचिरोली नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी त्यांनी सामाजिक उपक्रमही राबिवले होती.

पाटील यांनी गडचिरोलीमध्ये उल्लेखनीय सेवा बजावल्याने पोलीस दलाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक बक्षीसेही प्राप्त झाली आहेत. गडचिरोलीमध्ये खडतर सेवा बजावून दोन दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण घडविल्याबद्दल त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पाटील यांचे अभिनंदन केले.


कॅमेरा चोरीप्रकरणात महत्वपूर्ण कामगिरी

सचिन पाटील हे मालवण पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१७ पासून कार्यरत आहेत. त्यांनी गतवर्षी मालवण शहरात झालेल्या चोरीप्रकरणाचा तपास करताना संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला होता. पाटील हे मालवणातील हायस्कूल, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबाबत व्याख्यानही देतात.

 

Web Title: Deputy Superintendent of Police Sachin Patil honored with Special Service Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.