शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर, शिक्षण सभापतींचे राजीनामे

By admin | Updated: July 5, 2015 00:49 IST

महापौरांचा कार्यालय प्रवेश : उपमहापौरपदासाठी चढाओढ; प्रत्यक्ष कामासाठी अल्पकाळ असल्याने धावपळ

कोल्हापूर : तृप्ती माळवी यांच्या लाचखोरी प्रकरणाचा महापालिकेवरील डाग अखेर शनिवारी नूतन महापौरांची निवड झाल्यानंतर पुसला गेला. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागणार असल्याने दोन महिन्यांचा अल्प काळच नूतन महापौर वैशाली डकरे यांना मिळणार आहे. त्यामुळे निवडीनंतर महापौरांनी तत्काळ कार्यालय प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण केले. यानंतर ठरल्याप्रमाणे उपमहापौर मोहन गोंजारे व शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते यांनी महापौरांकडे राजीनामा सादर केला. उपमहापौर व शिक्षण मंडळ सभापतिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांकडून येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल; तर शिक्षण मंडळ सभापतीची निवड मंडळाचे सदस्य मंगळवारी (दि. १४) करणार आहेत. शिक्षण मंडळ सभापतिपदी महेश जाधव यांची निवड अंतिम असल्याचे मानले जाते; तर उपमहापौरपदासाठी ‘जनसुराज्य’च्या मृदुला पुरेकर, राष्ट्रवादीचे जालंदर पवार, मधुकर रामाणे, भूपाल शेटे यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे. दरम्यान, महापौरांनी निवडीनंतर तत्काळ कामकाज सुरू केले. माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने काहीशी मरगळ आलेल्या कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत दिवसभर उत्साह जाणवत होता. कॉँग्रेसचे नगरसेवक दिवसभर महापालिकेत उपस्थित होते. येत्या निवडणुकीसाठी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महापौर निवड हा बूस्टर डोस ठरणार आहे. सतेज पाटील गट सक्रिय गेल्या पावणेपाच वर्षांच्या महापालिकेच्या सत्तास्थापनेनंतर प्रथमच सतेज पाटील महापालिकेत आले. सकाळी महापौरांना ते स्वत:च्या गाडीतून महापालिकेत घेऊन आले, तर चार वाजता स्मार्ट सिटीसाठी आयोजित बैठकीत सहभाग नोंदवून त्यांनी प्रशासनास सूचना केल्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सतेज पाटील गट पुन्हा जोमाने सक्रिय झाल्याने नगरसेवक व कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)