शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दादांचा वादा.. के. पी. पाटील यांना मिळाला 'बिद्री'चा इरादा; डिस्टलरी प्रकल्पाला इरादा पत्र मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:32 IST

आजी-माजी आमदारांच्या आरोपांना पूर्णविराम मिळाला

दत्ता लोकरेसरवडे : कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला उपस्थित राहून दादांच्या नेतृत्त्वाबद्दल बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी जोरदार भाषण ठोकल्याचा परिणाम म्हणून कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाला तातडीने बुधवारी इरादा पत्र मंजूर झाले. त्यामुळे के. पी. पाटील यांचा इरादा नेक होता, त्यामुळेच बिद्रीचा मद्यार्क प्रकल्प सेफ झाला, अशी चर्चा कार्यक्षेत्रात आहे.बिद्री साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर विस्तारीकरणाचा मोठा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर १३५ कोटी रुपयांचा डिस्टलरी प्रकल्प पूर्णत्वास येत असतानाच इरादा पत्राची अडवणूक झाली आणि हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी के. पी. पाटील यांनी बदलत्या राजकीय समीकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तशी अवघ्या काही दिवसांतच इरादा पत्राला मंजुरी मिळाली.

हा प्रकल्प उभा करताना प्रकल्पामुळे कारखाना पूर्ण तोट्यात जाणार, अशी टीका त्यांच्यावर झाली. इथेनॉल मद्यार्क निर्मितीचा १३५ कोटी रुपयांचा प्रकल्प उभा करण्याचे काम सुरू झाले. मात्र, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या इरादा पत्राला आमदार प्रकाश आबिटकर यांनी आक्षेप घेत विरोध दर्शविला. राज्यातील बदलत्या समीकरणात के. पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाबरोबरच बिद्रीचाही इरादा पक्का होता, हे त्याचवेळी निश्चित झाले.

के. पी. पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत या सभेला हजेरी लावली आणि बिद्रीच्या इरादा पत्राला अखेर मंजुरी मिळाली. आजी-माजी आमदारांच्या आरोपांना पूर्णविराम मिळाला. 

सहवीज प्रकल्पामुळे बिद्री कारखाना आर्थिकदृष्ट्या भक्कम झाला. गतवर्षी ८ लाख टन गाळपाची नोंद झाली. त्यामुळे विस्तारीकरणावर शिक्कामोर्तब झाले. आता इथेनॉल प्रकल्प ऊस उत्पादक सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल. - के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेK P. Patilके. पी. पाटीलAjit Pawarअजित पवार