देवकर पाणंदमध्ये वृद्धासह दोघांना मारहाण,सहाजणांवर पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 17:19 IST2020-07-04T17:17:46+5:302020-07-04T17:19:08+5:30
किरकोळ कारणांवरून सहाजणांनी वृद्धांसह दोघांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार देवकर पाणंदमधील वसंतराव सरनाईक पार्कमध्ये घडला.

देवकर पाणंदमध्ये वृद्धासह दोघांना मारहाण,सहाजणांवर पोलिसांत गुन्हा
कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून सहाजणांनी वृद्धांसह दोघांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार देवकर पाणंदमधील वसंतराव सरनाईक पार्कमध्ये घडला. याबाबत सुशांत सुनील तडवळे (रा. मंगळवार पेठ), ईश्वर घाटगे व इतर अनोळखी चौघे अशा एकूण सहाजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सरनाईक पार्क परिसरात सुशांत तडवळे यांचे पत्र्याचे शेड आहे. या शेडचे कुलूप काढून ते व त्यांचे मित्र असे एकूण सहाजण बसले होते. त्याचवेळी शेजारील निशिकांत सरनाईक यांनी त्यांना माझ्या पत्र्याच्या शेडचेही कुलूप कोणी काढले? असा जाब विचारला.
त्यावरून चिडून जाऊन तडवळे व त्याचा मित्र घाटगे यांनी सरनाईक व त्यांच्या भावांना मारहाण केली. तसेच त्यांच्या शेडमधील पाण्याची मोटरही नेली असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.