कोल्हापुरात सकाळी ९ पर्यंत दाट धुके: हंगामातील पहिल्याच धुक्याचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 03:29 PM2020-10-08T15:29:57+5:302020-10-08T15:31:42+5:30

environment, kolhapurnews, fog दाट धुक्याची शुभ्र शाल घेऊनच गुरुवारची पहाट उगवली. या हंगामातील पहिल्याच दाट धुक्याने आल्हाददायी अनुभूती दिली. निसर्गाच्या या सुखद गारव्याचा निसर्गप्रेमींनी यथेच्छ आनंद लुटला. रंकाळा, पंचगंगा घाट येथे तर निवांत धुक्यात बसून सृष्टीही शुभ्रशाल अंगावर पांघरुण घेतली.

Dense fog in Kolhapur till 9 am: Experience of the first fog of the season | कोल्हापुरात सकाळी ९ पर्यंत दाट धुके: हंगामातील पहिल्याच धुक्याचा अनुभव

कोल्हापुरात गुरुवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली. या हंगामातील पहिल्याच धुक्याचा अनुभव पंचगंगा नदीघाटावर बसून धुक्याच्या ढगात हरवण्याचा मोह आवरता आला नाही. (छाया: आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्दे कोल्हापुरात सकाळी ९ पर्यंत दाट धुकेहंगामातील पहिल्याच धुक्याचा अनुभव

कोल्हापूर: दाट धुक्याची शुभ्र शाल घेऊनच गुरुवारची पहाट उगवली. या हंगामातील पहिल्याच दाट धुक्याने आल्हाददायी अनुभूती दिली. निसर्गाच्या या सुखद गारव्याचा निसर्गप्रेमींनी यथेच्छ आनंद लुटला. रंकाळा, पंचगंगा घाट येथे तर निवांत धुक्यात बसून सृष्टीही शुभ्रशाल अंगावर पांघरुण घेतली.

साधारणपणे सप्टेबरमध्ये धुके पडायला सुरुवात होते, पण हे वर्ष त्याला अपवाद ठरले. अधून मधून पाऊस सुरुच राहिल्याने मागील पंधरवड्यात एखाद दुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्हा कवेत घेऊ शकेल असे धुके पडलेच नाही. गुरुवारी मात्र धुक्याने ही सर्व कसर भरुन काढत अख्ख्या जिल्ह्याला सकाळी नऊ वाजेपर्यंत कवेत घेतले.

दवाचे प्रमाण कमी असलेतरी दाट धुक्यामुळे दहा फुटाच्या अंतरावरचे कांही दिसत नव्हते. वाहनधारकांना हेडलाईट लावूनच वाहने हाकावी लागली. कोल्हापूर शहरात तर पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी धुके असतानाही पहिलाच आनंद म्हणून निवांतपणे विहरण्याचा अनुभव घेतला.

शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, टेंबलाई टेकडी, पंचगंगाघाट, जोतिबा रोड, संध्यामठ, रंकाळा चौपाटीवर धुक्यासोबत फिरताना गरमागरम चहाचे घोट आनंद द्वीगुणीत केला . मान्सूने परतीची वाट धरल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. त्याची सुरुवात या धुक्याने केली आहे.

 

Web Title: Dense fog in Kolhapur till 9 am: Experience of the first fog of the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.