जिल्हा परिषदेसमोर आशांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 20:08 IST2021-05-24T20:07:13+5:302021-05-24T20:08:50+5:30
: आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर सोमवारी आशा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.
मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी पदाधिकऱ्यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी आशांना देय एक हजाराचे मानधन फरकासह दिले जाईल, आशांना फिल्डवर काम करताना पीपीई कीट, सॅनिटायझर, हातमोजे दिले जातील, कोरोनासंबंधीच्या सर्व्हेवेळी आशांना, गटप्रवर्तकांना धमकावणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन चव्हाण यांनी आशा संघटना पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आशा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा नेत्रदीपा पाटील, सचिव उज्वला पाटील, सहसचिव माया पाटील, खजिनदार संगीता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आशांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी एक दिवसाचा संप पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील चार हजार आशा आणि गटप्रवर्तक सहभागी झाले.