शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत डिजिटल फलक हटवणार

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

इचलकरंजीतील बैठकीत निर्णय : मंगळवारपासून कारवाई करणार

इचलकरंजी : शहरात गल्लीबोळासह प्रमुख रस्त्यांवर असलेले अनधिकृत डिजिटल फलक मंगळवार (दि. २८) पासून पोलीस बंदोबस्तामध्ये हटविण्याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळी नगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच विनापरवाना फलक उभारल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही ठरविण्यात आले.येथील जवाहरनगरमध्ये फलक उभारण्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत डिजिटल फलकांविषयी निर्णय घेण्याकरिता नगरपालिका सभागृहामध्ये प्रशासन, पोलीस व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली. त्यावेळी जातीय तणाव निर्माण होईल, अशा फलकांना परवानगी देण्यात येऊ नये. फलक उभारणीची ठिकाणे निश्चित करावीत व परवानगी देताना मजकूर व छायाचित्रे यांची पूर्वपरवानगी घ्यावी. तसेच परवानगी घेणाऱ्याचे नाव आणि कालावधी फलकावर नमूद करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना मांडण्यात आल्या.बैठकीमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे, शिवसेना शहरप्रमुख धनाजी मोरे, दिलीप माणगावकर, प्रमोद इदाते, बजरंग लोणारी, शशिकांत कालेकर, आदींनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)ये रे माझ्या मागल्या....अनधिकृत डिजिटल फलक हटविण्याबरोबरच फलकांवरील मजकूर, छायाचित्रे व अन्य महत्त्वाच्या बाबींबाबत आचारसंहिता ठरविणाऱ्या बैठका यापूर्वी नगरपालिकेमध्ये अनेकवेळा झाल्या, त्यामध्ये निर्णयही घेण्यात आले. मात्र, या निर्णयाची कधीही अंमलबजावणी झाली नाही. अशी वस्तुस्थिती असताना वारंवार बैठका घेऊन ‘ये रे माझ्या मागल्या...’ अशी शुक्रवारची बैठक ठरू नये, अशा आशयाची चर्चा बैठकीमध्ये होत होती.