कोल्हापुरात रुग्ण अहवालांना विलंब, प्रशासन चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:11 IST2020-04-15T13:10:20+5:302020-04-15T13:11:53+5:30
कोल्हापूर : रुग्णांच्या घशातील स्रावांचा अहवाल पुण्याहून विलंबाने मिळत असल्याने मिरज येथे नवी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली; परंतु कोल्हापूरचे ...

कोल्हापुरात रुग्ण अहवालांना विलंब, प्रशासन चिंतेत
कोल्हापूर : रुग्णांच्या घशातील स्रावांचा अहवाल पुण्याहून विलंबाने मिळत असल्याने मिरज येथे नवी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली; परंतु कोल्हापूरचे गेल्या तीन दिवसांमधील २२५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याने आरोग्य आणि जिल्हा प्रशासनही चिंतेत पडले आहे.
जोपर्यंत रुग्णाचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्याच्याबाबत कोणताही निर्णय घेता येत नाही. रुग्णही एकमेकांकडे संशयाकडे पाहत आहेत. गेल्या तीन दिवसांमधील २२५ अहवाल येण्याची प्रतीक्षा असून तातडीने कोल्हापूरच्या पातळीवरील प्रयोगशाळा सुरू होण्याची गरज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यांतील तिघांचे १४ दिवसांनंतरचे दोन अहवालही निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित तिघांचीही तब्येत स्थिर आहे. अहवाल लगेच आले तर निगेटिव्ह रुग्णांना संस्थात्मक, ज्यांची तब्येत चांगली आहे अशांना घरगुती अलगीकरणासाठी सोडता येते; परंतु अहवालच न आल्याने प्रशासनालाही हे निर्णय घेणे अशक्य झाले आहे.
आचाऱ्याची नियुक्ती
येथील सीपीआर रुग्णालयामध्ये १७२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यांना कोरोना संशयित कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे; परंतु जेवणाबाबत त्यांच्या तक्रारी असल्याने मंगळवारपासून स्वतंत्र आचाºयाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.