त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ 

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 13:24 IST2023-06-26T13:22:44+5:302023-06-26T13:24:17+5:30

..तर त्याला आमचा नाईलाज

Deepak Kesarkar will fire cannon on Aditya Thackeray tomorrow | त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ 

त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ 

कोल्हापूर : शिवसेनेचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर हे उद्या मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार आहेत. ठाकरे यांनी बंडखोरांबाबत बेलगाम आणि बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. परंतू आज शाहू जयंतीदिनी मी याबद्दल काही प्रतिक्रिया देणार नसल्याचे केसरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

केसरकर म्हणाले, आम्ही जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर मुंबईत आलो तेव्हा सर्वांच्या बैठकीत ठरले होते की उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा कुटुंबियांबद्दल कोणतीही टीका करायचे नाही असे निश्चित केले होते. परंतू त्यांनीच आता ताळतंत्र सोडला आहे. ज्या पध्दतीने आदित्य टीका करत आहेत त्यामुळे माझ्यासारखा सहनशील माणूसही आता हे सहन होण्याजोगे नाही असे म्हणतोय. मग आमचे सहकारी घातलेल्या बंधनातून मुक्त झाले तर त्याला आमचा नाईलाज आहे. त्यांना जे काही उत्तर द्यायचे आहे ते सडेतोड पध्दतीने मुंबईतून दिले जाईल. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

Web Title: Deepak Kesarkar will fire cannon on Aditya Thackeray tomorrow