शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

खोल समुद्रातील समुद्री पक्षी पावसाळी हंगामाशिवाय किनाऱ्यावर, देवगड-कुणकेश्वर किनारपट्टी भागात विहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:58 IST

महाराष्ट्रात १५ ते १६ समुद्री पक्ष्यांच्या प्रजाती

कोल्हापूर : चक्रीवादळामुळे वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे खोल समुद्रात अधिवास करणारे पेलाजिक म्हणजे समुद्र पक्षी जुलैमध्ये दिसण्याची अपेक्षा असताना हंगाम नसतानाही देवगड-कुणकेश्वर किनारपट्टी भागात दिसत असल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही चक्रीवादळ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हे दुर्मीळ समुद्री पक्षी सिंधुदुर्गच्या किनारी भागापर्यंत उडत आले आहेत.समुद्री पक्षी हे खोल समुद्रातील अधिवासासाठी ओळखले जातात. ते सहसा जमिनीवर येत नाहीत. त्यामुळे तिथल्या बेटांवरच या पक्ष्यांची वीण वसाहत असते. मात्र, पावसाळी हंगामात वाऱ्यामुळे हे समुद्री पक्षी मुख्य भूमीपर्यंत वाहवत जातात. सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर अवेळी पावसाचे आगमन झाले आहे.मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली येथील पण सध्या सिंधुदुर्गातील देवगड येथील रहिवाशी पक्षी निरीक्षक श्रीकृष्ण मगदूम यांनी देवगड आणि कुणकेश्वर किनारपट्टी भागातून फ्रिगेटबर्ड, विल्सन स्ट्रोम पेट्रेल, आर्टिक स्कुआ या दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची नोंद केली आहे. यापूर्वीही त्यांनी व्हिनचॅट या स्थलांतरित पक्ष्यांची नोंद केली होती.महाराष्ट्रात १५ ते १६ समुद्री पक्ष्यांच्या प्रजाती

  • जगातील सर्व पक्षी प्रजातींपैकी ३.५ टक्के प्रजाती समुद्री पक्षी गटातील आहेत. भारतात सागरी परिक्षेत्रात समुद्री पक्ष्यांच्या साधारण ५० प्रजाती सापडतात, तर महाराष्ट्रात १५ ते १६ प्रजाती आढळतात.
  • फ्रिगेटबर्ड पक्ष्याच्या नेमक्या प्रजातीची ओळख पटलेली नाही. लेसर फ्रिगेटबर्ड हा पक्षी ७५ सेमीचा म्हणजेच अंदाजे २ फूट लांबीचा असला तरी, तो या आकाराने लहान पक्षी आहे. हिंद आणि पॅसिफिक महासागरात तो आढळतो.

जे खुल्या समुद्रात राहतात त्या पक्ष्यांना पेलाजिक म्हणतात. पेट्रेल, स्कुआ, फ्रिगेटबर्ड असे दुर्मीळ पक्षी फक्त अंडी घालण्यासाठी किंवा नवीन पिढी वाढवण्यासाठी जमिनीवर विशेषत: दुर्गम बेटांवर येतात. लांब आणि अरुंद पंखांचा वापर करून उडतात, त्यामुळे त्यांना हवेत जास्त वेळ राहणे शक्य होते. -श्रीकृष्ण मगदूम, पक्षी निरीक्षक.

English
हिंदी सारांश
Web Title : Rare Seabirds Spotted on Devgad-Kunkeshwar Coast Outside Monsoon Season

Web Summary : Unusual cyclonic winds pushed pelagic seabirds to Devgad-Kunkeshwar coast, Sindhudurg, defying seasonal norms. Birdwatcher Magdum spotted Frigatebirds, Wilson's Storm Petrels, and Arctic Skuas. Maharashtra hosts 15-16 seabird species; these birds typically remain offshore, visiting land only for breeding.