महिनाअखेर घ्या ‘त्या’ ध्वजाबाबत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:55+5:302021-01-22T04:22:55+5:30

बेळगाव : पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून महामोर्चा स्थगिती केल्यानंतर बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटविण्यासंदर्भात म. ए. समितीच्या नेत्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची ...

Decide on 'that' flag at the end of the month | महिनाअखेर घ्या ‘त्या’ ध्वजाबाबत निर्णय

महिनाअखेर घ्या ‘त्या’ ध्वजाबाबत निर्णय

बेळगाव : पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून महामोर्चा स्थगिती केल्यानंतर बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटविण्यासंदर्भात म. ए. समितीच्या नेत्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या २८ किंवा २९ जानेवारी रोजी त्या ध्वजाबाबत बैठक घेण्यास होकार दिला आहे.

बेळगाव महानगरपालिकेसमोर उभारलेला अनधिकृत लाल-पिवळा ध्वज हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने गुरुवारी महामोर्चा काढण्यात येणार होता. मात्र हा मोर्चा काढू नये या पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला. त्यानंतर म. ए. समितीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली. त्यावेळी येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र फार उशीर होणार

असल्याने समिती नेत्यांनी जानेवारी २८ किंवा २९ रोजी बैठक घेऊन ध्वजाबाबत निर्णय द्या, अशी विनंती केली. ही विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. आजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी लाल-पिवळ्या ध्वजाजवळ आम्हीदेखील भगवा ध्वज उभारतो. त्यानंतर निर्णय घेऊन दोन्ही ध्वज हटवायचे असतील तर हटवा, असा अट्टहास समितीच्या नेत्यांनी धरला होता. त्यावर तसे काही करू नका, अशी विनंती जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केली.

याप्रसंगी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, राजाभाऊ पाटील, नेताजी जाधव, मदन बामणे, दत्ता उघडे, संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, दत्ता जाधव, अरविंद नागनुरी, प्रवीण तेजम आदी उपस्थित होते.

फोटो: बेळगावचे डीसीएमजी हिरेमठ यांच्याशी चर्चा करताना समिती नेते.

Web Title: Decide on 'that' flag at the end of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.