शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी चालकाने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला, कोल्हापूर पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:01 IST

दोन आरोपींना अटक, ५० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : कर्जबाजारी झालेल्या चालकाने मालकाच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. सम्राटनगरात घरात घुसून आजोबांना चाकूचा धाक दाखवत दोन चोरट्यांनी ४४ तोळे दागिने ठेवलेले डिजिटल लॉकर लुटले होते. या प्रकरणाचा बारा तासांत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी टेकडी येथे सापळा रचून दोघांना वाहन, मुद्देमालांसह अटक केली.चालक प्रकाश दत्तात्रय चौगुले (वय ३८, रा. हंचनाळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) आणि गुन्ह्यात सहभागी असलेला त्याचा साथीदार अमित विश्वनाथ शिंदे (वय २५, रा. यादवनगर, डवरी वसाहत, कोल्हापूर) या दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४४० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख ७५ हजार रुपये, असा एकूण ५० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक डॉ. बच्चू म्हणाले, लक्ष्मी लाडा पंप कंपनीचे मालक राजू जयकुमार पाटील (वय ६०, रा. गोविंदराव हौसिंग सोसायटी, सम्राटनगर) यांच्या घरात घुसून आजोबांना चाकूचा धाक दाखवत दोन चोरट्यांनी ४४ तोळे दागिने ठेवलेले डिजिटल लॉकर लुटले होते. ओळख पटू नये म्हणून हेल्मेट घालून चोरी केली होती. हा प्रकार १२ जूनला दुपारी तीन ते सव्वातीनच्या दरम्यान घडला होता. भर दुपारी घडलेल्या जबरी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चार पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू होता. पाटील यांच्या ओळखीच्या व्यक्तीनेच ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून तपास सुरू केला.

पथकातील पोलिस अंमलदार सुरेश पाटील यांना पाटील यांच्या गाडीवरील चालक आणि त्याच्या साथीदाराने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. या दोघांचे मोबाइल लोकेशन तपासले. ते लक्ष्मी टेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पथकाने सापळा रचला. ते एका चारचाकी वाहनातून पसार होण्याच्या तयारीत होते. त्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात दोघेही सापडले. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिकीत तीन लहान लॉकर, दोन बँगा, चाकू, दोन हेल्मेट, रेनकोट असे साहित्य सापडले. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी पाटील यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.

चारचाकी आणि एक दुचाकी गाडी जप्तचालक चौगुले याला पाटील यांच्या घरातील सर्व साहित्याची माहिती होती. त्याने घराच्या बाहेरील बाजूस ठेवलेली चावीने कुलूप काढून घरात प्रवेश केला होता. वयस्कर सासू-सासऱ्यांना चाकूचा धाक दाखवून धाडसी चोरी केली होती. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चारचाकी वाहन जप्त केले आहे.