शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडचे संस्थानकालीन थिएटर पाडण्यावरून वाद

By admin | Updated: September 24, 2014 00:40 IST

शॉपिंग सेंटर, सिनेमागृहाचा प्रस्ताव : मुंबई उच्च न्यायालयात याचिका

गणपती कोळी - कुरुंदवाड -नगरपालिकेने येथील संस्थानकालीन भालचंद्र थिएटर पाडून त्या ठिकाणी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचे वाहन पार्किंग, शॉपिंग सेंटर व अद्ययावत सिनेमागृह बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, शहरातील काहींनी संस्थानकालीन इमारती पाडण्याला विरोध करून थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयीन वादातून शहराचा विकास होणार नाही, यासाठी पालिका पदाधिकारी व याचिकाकर्त्यांनी शहराच्या विकासासाठी प्राधान्य देऊन यावर सर्वमान्य तोडगा काढण्याची गरज आहे. येथील संस्थानकालीन भालचंद्र थिएटरचे बांधकाम जुने आहे. तसेच इमारतही उंच आहे. यामुळे या थिएटरमध्ये नैसर्गिकरीत्या गारवा मिळतो. काही शहरवासीय मनशांती, विरंगुळा व करमणूक म्हणून या थिएटरमध्ये येत असतात. शहराची वाढती लोकसंख्या, त्यांना पुरवाव्या लागणाऱ्या गरजा व त्यासाठी पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी नव्या पर्यायांच्या शोधात नगरपालिका आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या थिएटरचे पालिकेला फारसे उत्पन्न मिळत नाही. या मोठ्या शहरात वाहन पार्किंगची व्यवस्थाच नाही. त्यामुळे ही जुनी इमारत पाडून तेथे तळमजल्यावर वाहन पार्किंग, शॉपिंग सेंटर व तिसऱ्या मजल्यावर अद्ययावत साठ आसनी सिनेमागृह बांधण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. निवडणुकीच्या अचारसंहितेनेतर या प्रस्तावासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नात असतानाच मुंबई उच्च न्यायालयात कृष्णात लोकरे यांच्यासह चौघांनी या प्रस्तावाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यामुळे याचिकाकर्ते व नगरपालिका पदाधिकाऱ्यांमध्ये तेढ निर्माण झाले आहे.भालचंद्र थिएटर ही संस्थानकाळातील केवळ वास्तूच आहे. जुनी वास्तू असल्याने पडझड ही चालूच आहे. या जागेचा वापर पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी केल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल. याचिका दाखल करणाऱ्यांना पालिका नेहमी सहकार्य करीत असताना, अशी याचिका दाखल करणे दुर्दैवी आहे.- संजय खोत,  -नगराध्यक्ष, कुरुंदवाड नगरपरिषदशहराच्या मध्यभागी १५ गुंठे क्षेत्रावर संस्थानकालीन भालचंद्र मेमोरियल हॉल आहे. शहरवासीयांच्या करमणुकीसाठी छोट्या पडद्यावरून सिनेमा दाखवितात. याचा ठेका गेल्या ६० वर्षांपासून हुबळी येथील गणेश नाईक कुटुंबाकडे आहे. घरोघरी केबल नेटवर्क व अत्याधुनिक सिनेमागृह यामुळे चित्रपट शौकिनांनी या चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या इमारतीचा  -उत्पन्न म्हणून नगरपालिकेला उपयोग होत नाही.