शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News kolhapur: 'सावकार' म्हणण्यांचा वाद जीवावर बेतला, चाकूहल्यातील जखमीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 19:29 IST

हिशेबाचे पैसे मोजताना मित्र संदीप मानेने ‘सावकार’ म्हणून हाक मारली. या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली.

कोल्हापूर : 'सावकार' म्हणून हाक मारली म्हणून तरूणाला धारदार चाकूने भोकसले. सोनतळी (ता. करवीर) येथे झालेल्या या चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणाचा उपचार सुरू असताना सीपीआरमध्ये आज, शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भरत शंकर नाईक (वय २९, केर्ली, ता. करवीर) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी मयताचा मित्र संदीप बापू माने (रा. सोनतळी, करवीर) या संशयितास पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भरत नाईक हा गवंडी काम करत होता. तो लक्षतिर्थ वसाहत येथील रहिवासी आहे. गवंडी कामासाठी केर्ली (ता. करवीर) येथे तो भाडेकरू म्हणून राहत होता. काल, शुक्रवारी रात्री रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भरत हा सोनतळी येथे हिशेबाचे पैसे मोजत उभा होता. त्यावेळी त्यांचा मित्र संदीप माने त्याला ‘सावकार’ म्हणून हाक मारली. या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली.वाद मिटविण्यासाठी भरत याला माने यांच्या घराजवळ बोलवून घेतले. त्यावेळी माने याने भरत नाईक यांच्यावर चाकूहल्ला केला. हल्ल्यात भरत यांच्या पोटावर व मानेवर गंभीर दुखापत झाली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे नागरिक जमा झाले. त्यांनी भरतला उपचारासाठी सीपीआर दाखल केले.दरम्यान, करवीर पोलिसांनी तातडीने संशयित हल्लेखोर मानेला ताब्यात घेतले. त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही नोंदवला. दरम्यान, उपचार सुरू असताना आज शनिवारी सकाळी भरत नाईक यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संशयित माने याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस