शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तरुणांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यासह दोघांवर जीवघेणा हल्ला, विद्यार्थी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:13 IST

हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले

कोल्हापूर : उचगाव येथील मणेर माळ परिसरात एका बिअर शॉपीजवळ सुरू असलेला तरुणांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला. बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या घटनेत कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी गौरव पोवार (वय २०, सध्या रा. सरनोबतवाडी, मूळ रा. सोलापूर) याच्यासह विनायक महादेव माळी (३०, रा. उचगाव) हे जखमी झाले दोन्ही जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. गौरव पोवार याची प्रकृती गंभीर आहे.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मणेरमाळ परिसरातील एका बियर शॉपी जवळ तरुणांच्या दोन गटात हाणामारी सुरू होती. वाद सोडवण्यासाठी गौरव पोवार आणि विनायक माळी पुढे गेले. त्यांनी तरुणांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही तरुणांनी एडका, कोयता अशा धारदार शस्त्रांसह दोघांवर हल्ला केला या घटनेत गौरव पोवार याच्या पोटात आणि छातीत खोलवर जखम लागल्याने तो जमिनीवर कोसळला तर विनायक माळी यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.जीवघेण्या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. अभिजीत बाबासाो यादव आणि अविनाश जनार्दन मोळे यांनी तातडीने जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. पोवार याच्या पोटात आणि फुफ्फुसाला दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सीपीआरमधील डॉक्टरांनी दिली. त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

हल्लेखोर कोण?घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस मणेरमाळ परिसरात पोहोचले. येथील बिअर शॉपीजवळ आधीच काही जणांचा वाद सुरू होता. त्यानंतर दोघांवर जीवघेणा हल्ला झाला. एकमेकांशी वाद घालणारे आणि जीवघेणा हल्ला करणारे नेमके कोण होते, याचा शोध घेण्याचे काम गांधीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस