शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: पोषण आहारात आढळली मेलेली बेडकी, पुरवठा थांबवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:20 IST

हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाचे वातावरण पसरले

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील शेणवडेपैकी चौगुलेवाडी येथे अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेली बेडकी आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तालुक्यातील पोषण आहाराचे वाटप थांबवण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागांतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना सकस आहार दिला जातो. यामध्ये डाळ, तांदूळ, तिखट, मीठ आणि ‘सुकडी’च्या पाकिटांचा समावेश असतो. चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतून लाभार्थ्यांना या आहाराचे वाटप करण्यात आले होते. मात्र, एका लाभार्थ्याने जेव्हा ‘सुकडी’चे पाकीट उघडले, तेव्हा त्यात मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळली.हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाचे वातावरण पसरले. सरकारी योजनेतून मिळणाऱ्या अन्नातच जर अशा प्रकारे घाण आणि मृत प्राणी आढळत असतील, तर मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात या पोषण आहाराचा पुरवठा एकाच ठेकेदाराकडून केला जातो. त्यामुळे पॅकेजिंगच्या वेळी ही बेडकी पाकिटात गेली कशी? उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.

गगनबावडा तालुक्यातील हा प्रकार समजला. त्यानंतर तातडीने पोषण आहाराचे वाटप थांबवण्यात आले आहे. शनिवारी या प्रकाराची सखोल माहिती घेण्यात येणार आहे. - नितीन मस्के, जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Dead Frog Found in Kolhapur Nutrition Kit, Distribution Halted

Web Summary : A dead frog was discovered in a nutrition packet distributed by an Anganwadi in Kolhapur, causing outrage. Distribution has been stopped. An investigation is underway regarding hygiene standards and the supplier's accountability after this incident. Parents are demanding strict action.