शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ..म्हणून सासू, सासऱ्याने एस.टी.तच आवळला जावयाचा गळा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:40 IST

गडहिंग्लज-कोल्हापूर एसटीत कृत्य 

कोल्हापूर : मुलीला वारंवार त्रास देत असल्याने सासरा आणि सावत्र सासूने ट्रॅक पँटच्या दोरीने गळा आवळून जावयाचा खून केला. गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटीत कागलजवळ जावयाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर ठेवून त्यांनी पळ काढला. गुरुवारी (दि. २६) सकाळी खुनाचा प्रकार निदर्शनास येताच शाहूपुरी पोलिसांनी चार तासांत सासू आणि सासऱ्यास अटक केली.संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत जावयाचे नाव आहे. हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (४८) आणि गौरवा हणमंताप्पा काळे (३०, दोघे रा. हुनगीनाळ, ता. गडहिंग्लज) असे अटकेतील सासू, सास-याचे नाव आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकातील एस.टी. प्रोव्हिजन स्टोअर्सच्या पायरीवर एका तरुणाचा मृतदेह आढळला. दोरीने गळा आवळल्याचे व्रण दिसताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला.मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या डायरीनुसार त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे स्पष्ट झाले. त्याच डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाइल नंबर मिळाला. मोबाइलवर कॉल केल्यानंतर पत्नी गडहिंग्लज तालुक्यातील हुनगीनाळ येथे असल्याचे समजले. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मृतदेह ठेवणाऱ्या एका बाईचे आणि माणसाचे फुटेज मिळाले. शाहूपुरी पोलिसांनी हे फुटेज गडहिंग्लज पोलिसांना पाठवून पडताळणी करण्यासाठी सांगितले असता, ते संशयित मृताचे सासू, सासरे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

याचा बंदोबस्त करा..संदीप शिरगावे हा ट्रकचालक होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी करुणा मुलाला घेऊन माहेरी गेली होती. चार दिवसांपूर्वी तो हुनगीनाळ येथे पत्नीकडे गेला. तिथेही तो त्रास देत असल्याने पत्नीने तिच्या वडिलांकडे तक्रार केली. एक तर याचा बंदोबस्त करा, नाही तर मी आत्महत्या करते, असा निर्वाणीचा इशारा तिने दिल्याने तिच्या आई, वडिलांनी जावयाचा काटा काढण्याचा कट रचला. गुन्ह्यातील पत्नीच्या सहभागाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस