दत्त दालमियाचे ११ लाखांचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:43+5:302021-04-04T04:24:43+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले- पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे ...

Datta Dalmiya's Rs 11 lakh | दत्त दालमियाचे ११ लाखांचे गाळप

दत्त दालमियाचे ११ लाखांचे गाळप

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले- पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून कारखान्याच्या इतिहासात गाळपाचा उच्चांक गाठला. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाला आल्याने उद्दिष्टापेक्षा जादा लाखांचा टप्पा पार करता आला. यंदा कार्यक्षेत्रातील ऊसपुरवठ्यात पंचवीस टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती असलेल्या धोरणात्मक निर्णयाचे व ऊस बिलाबाबत विश्वासार्हतेचे हे फलित आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून दालमिया कारखान्याला ऊसपुरवठा करण्यात शेतकरी प्राधान्य देत आहेत. यावर्षी सातारा आणि सांगली जिल्ह्यांतूनदेखील मोठ्या प्रमाणात ऊस आणून गाळपाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडता आला. दोन-तीन लाख मेट्रिक टनाची उपल्बधता असलेला कारखाना यापूर्वी मकरसंक्रांतीला दीड-दोन लाख टन गाळप करून बंद पडायचा. कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांमुळे दालमिया कंपनीने ऊस उचलण्यासाठी शेतकरी वाट पाहत असल्याने कारखाना समाप्तीसाठी कंपनी गुढीपाढव्याचा मुहूर्त साधत आहे. साधारणपणे २००५ च्या हंगामात लोकरी मावा, महापूर आणि आर्थिक संकटामुळे लाखाचा टप्पा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाची आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. कोरोनाचे संकट आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे टाकून बसलेल्या टोळ्यांच्या कमतरतेमुळे अकरा लाखांचा शेवटचा टप्पा सर्वांसाठी कसोटीचा होता.

एकूण दिवस- १४४

एकूण गाळप - ११,००,३०६ मेट्रिक टन

उत्पादित साखर - १३,८६,८५० क्विंटल

सोबत संग्रहित कारखान्याचा फोटो वापरावा.

Web Title: Datta Dalmiya's Rs 11 lakh