शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

अंबाबाईसह जोतिबाचे रोज सहा तासच दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 8:07 PM

Mahalaxmi Temple Kolhapur, Religious Places, coronavirus पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिरासह अधिपत्याखाली असलेली सर्व ३०४२ मंदिरे आज, सोमवारपासून सकाळी नऊ ते दुपारी १२ व दुपारी चार ते सायंकाळी सात या सहा तासांसाठी रोज खुली राहणार आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून देवाच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भक्तांना देवदेवतांचे दर्शन घेता येणार आहे. मात्र, भक्तांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली पाळावी लागणार आहे.

ठळक मुद्देअंबाबाईसह जोतिबाचे रोज सहा तासच दर्शन

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिरासह अधिपत्याखाली असलेली सर्व ३०४२ मंदिरे आज, सोमवारपासून सकाळी नऊ ते दुपारी १२ व दुपारी चार ते सायंकाळी सात या सहा तासांसाठी रोज खुली राहणार आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून देवाच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भक्तांना देवदेवतांचे दर्शन घेता येणार आहे. मात्र, भक्तांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली पाळावी लागणार आहे.राज्य शासनाने शनिवारी (दि. १४) राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांच्या दीर्घ काळानंतर भाविकांना करवीरनिवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतीबासह देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेली मंदिरे व आदमापुरातील सद‌्गुरू संत बाळूमामा देवस्थान, नृसिंहवाडीतील दत्तदेवस्थान, बाहुबली येथील महावीर मंदिर, जिल्ह्यातील सर्व मशीद, चर्च, प्रार्थनास्थळे खुली होणार आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व मंदिरे १८ मार्च २०२० रोजीपासून दर्शनासाठी बंद करण्याचे आदेश दिले होते. मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंतर्गत असणाऱ्या मंदिरांसह खासगी मंदिरेही सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मंदिर व्यवस्थापनांनी मंदिरासह परिसर निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केला असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

 

  •  दर्शन केवळ सकाळी नऊ ते दुपारी १२ व दुपारी चार ते सायंकाळी ७ वाजता या कालावधीत.
  • दिवसभरात सहा तास मंदिर खुले राहणार आहे.
  • भाविकांसाठी पूर्व दरवाजा (सरलष्कर भवन) येथून प्रवेशरांग असणार आहे
  • मंदिरामध्ये कासव चौकातून दर्शन घेऊन दक्षिण दरवाजा (विद्यापीठ हायस्कूल) मार्गे बाहेर जाण्याचे आहे.
  • मंदिरात प्रवेश करतानाच भक्तांना ऑटोमेटिक सॅनिटायझर दिला जाणार आहे.
  • तापमान तपासणी, आवारात मास्क नसल्यास व मास्क काढून ठेवल्यास दंड आकारला जाणार आहे.
  • १० वर्षाखालील व ६५ वर्षांवरील नागरिक आणि गरोदर मातांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
  • या पार्श्वभूमीवर देवस्थान कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा उतरविण्यात आला आहे.
  • सोमवारी सकाळी ८.३० वाजता यानिमित्त अंबाबाई मंदिरात अष्टाक्षरी शांतिदुर्गा होम
  • वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात रुद्र होम व केदार कवच होणार आहे.
  • कोरोनाकाळात कार्य केलेल्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, पोलीस, वॉर्डबॉय, आया, आदींना सकाळी ८.३० वाजता दर्शनासाठी प्रथम मान म्हणून देवस्थान समितीने आमंत्रित केले आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांना अधीन राहून पहिल्या टप्प्यात सकाळी तीन व सायंकाळी तीन असे सहा तास मंदिर खुले राहणार आहे. या कालावधीत रांगेतून प्रवेश करणाऱ्या सर्व भक्तांना दर्शन दिले जाणार आहे. या दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळेcorona virusकोरोना वायरस बातम्या