शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

‘प्रतिसाद’च्या पोतदारची आत्महत्या

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

कर्जबाजारीपणास कंटाळून कृत्य

कोल्हापूर : वादग्रस्त ‘प्रतिसाद मिल्क’ व इव्हेंट कंपनीचा प्रमुख अमोल बाळासाहेब पोतदार (वय ३१, रा. शाहूनगर) याने गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास राजारामपुरी शाहूनगरातील राहत्या घरी हाताच्या शिरा ब्लेडने कापून घेऊन व गळफास लावून आत्महत्या केली.कर्जबाजारीपणा व प्रकृतीच्या कारणावरून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार व ‘किसान शक्ती’ मासिकाचे संपादक बाळ पोतदार यांचा तो मुलगा होय. / पोलिसांनी सांगितले, अमोल आई-वडील व पत्नीसमवेत शाहूनगरात राहत होता. आज सकाळी तो कुठेतरी बाहेरून जावून आला. दुपारी घरी आल्यानंतर जेवण करून बेडरूममध्ये गेला. चारच्या सुमारास त्याने आईकडे चहा मागितला. बराच वेळ तो चहा पिण्यास न आल्याने आई शकुंतला पोतदार त्याला बोलविण्यासाठी गेल्या असता बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्यांनी हाक मारली असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जोराने दरवाजा ढकलला असता तो सिलिंग फॅनला लटकत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केला. यावेळी त्याचे वडील, पत्नी व शेजारील लोक पळत आले. बेडरूममध्ये सर्वत्र रक्त सांडले होते व त्याचा तिथेच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमोलचा मृतदेह खाली उतरला. त्याची पाहणी केली असता उजव्या हाताची शीर ब्लेडने कापल्याच्या जखमा दिसून आल्या. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला. एका चांगल्या कुटुंबातील तरुणाने झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी पत्करलेला मार्ग अखेर आत्महत्येपर्यंत गेल्याची प्रतिक्रिया अमोल याच्या निधनानंतर उमटली. अमोल राजाराम महाविद्यालयात शिकला. प्रकृतीनेही तो सडपातळ होता. परंतु सतत काहीतरी भानगडी करण्याचा हव्यास होता. वर्षभरापूर्वी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरी लावतो म्हणून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यात त्याला अटकही झाली होती. या प्रकरणात त्याने तत्कालिन स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्यावरही अपहरणाचा आरोप केला होता. या प्रकरणी देशमुख यांना अटकही झाली होती. हे प्रकरणही राज्यभर बरेच गाजले होते. त्याचा तपास अजून सुरुच आहे. तोपर्यंत त्याने ‘प्रतिसाद’ ग्रुप आॅफ कंपनीज ही कंपनी स्थापन केली व त्यामार्फत अगोदर पुण्यात ‘प्रतिसाद’ दूध योजना सुरू केली. ‘सहा हजार रुपये भरून एक लिटर दूध वर्षभर घरपोच’ अशी ही योजना होती. ती पुण्यात अडचणीत आल्यावर कोल्हापुरात सुरू केली. नव्या ग्राहकांकडून पैसे घेऊन जुन्या ग्राहकांना दूध पुरवठा करायचा, असा फंडा तो वापरत होता. परंतु ही फसवणूक फार काळ चालली नाही. १२ आॅगस्टपासून कोल्हापुरातही ही योजना बंद पडली. या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते. शिवाय लोकांचाही पैशांसाठी तगादा सुरू होता. या सगळ््यालाच कुलूप घालून तो कायमचाच निघून गेला.कमी रक्तदाबाचा त्रास अमोलला कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता. दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. काल, बुधवारी तो रुग्णालयातून घरी आला. आज दुपारी ध्यान करणार असल्याचे त्याने आईला सांगितले होते. गेल्या चार महिन्यांपासून त्याचे पत्नीशीही भांडण झाले होते. त्यामुळे ते दोघे परस्परांशी बोलत नव्हते, असे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले...तरीही असेल गीत माझे..!अमोलने आठच दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुकवर ‘असेन मी...नसेन मी...तरीही असेल गीत माझे...’या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या ओळी पोस्ट केल्या होत्या व त्याबरोबरच ‘आठवण ठेवा,’ असाही मेसेज त्याने मित्रांना दिला होता. मला आयुष्याचा कंटाळा आला असल्याचे तो मित्रांकडे बोलून दाखवत होता.