शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलादपूर येथील दाभिळ गाव दरडीच्या छायेखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:28 IST

अतिवृष्टिमुळे  या गावाबरोबरच दाभिळ व हलदुले च्यावरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दरडी आल्या असून सुदैवाने दोन्ही गाव बचावले आहेत. 

- प्रकाश कदम

पोलादपूर: दिनांक 22 व 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये  देवळेग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावातील घरे दरडीखाली येवून पाच जण मृत्युमुखी पडले तर अंबेमाची या गावातील  87 ग्रामस्थांना  रेस्क्यू ऑपरेशन करून नानेघोल येथे सुरक्षित स्थळी हलवावे लागले. अतिवृष्टिमुळे  या गावाबरोबरच दाभिळ व हलदुले च्यावरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दरडी आल्या असून सुदैवाने दोन्ही गाव बचावले आहेत. 

महाबळेश्वर प्रतापगड परिसरामध्ये 548  मि मि पाऊस झाल्याने या सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात  ओहल मधे पाण्याचा लोट आल्याने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले.त्यामुळे आंबेनळी महाबळेश्वरच्या खालील भागामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी आल्या त्यामध्ये दाभिळ व हलदुले या गावाच्या वरच्या बाजूने  गावच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या त्यामुळे दाभिळ गावचा संपर्क तुटलेला आहे. गाव बचावले आहे गावच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून गावाच्या खालच्या बाजूला असलेल्या पाच घरांना धोका निर्माण झाला आहे तसेच दाभिळ आदिवासी वाडीच्या वरच्या बाजूला दरड कोसळल्याने या घरांना धोका निर्माण झाला आहे. 

यामधील दहा ते बारा कुटुंबांना ताबडतोब स्थलांतरित करणे गरजेचे आहे लहू लशे कडील साकव वाहून गेल्याने त्यांचा त्या बाजूचा ही संपर्क तुटलेला आहे आत्ता हलदुले बाजूला त्यांना पायी येण्यासाठी आलेल्या दरडी मधूनच आपला जीव मुठीत घेऊन यावे लागत आहे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन ह्या गावा बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी महादेव कोळी समाजाचे तालुकाध्यक्ष शांताराम शेलार यांनी मागणी केली आहे. 

सोळा आदिवासी कुटुंबे धोकादायक स्थितीत आहेत त्यातील आठ कुटुंबे येथे वास्तव्याला असून बाकी कुटुंब बाहेरगावी आहेत ह्या जलप्रलयात विहिरी ,पाण्याचे तलाव साकव, रस्ते वाहून गेल्याने दुर्गम भागातील लहुल से करंजे आदिवासीवाडी, दाभिळ हलदुळे या गावांचा संपर्कच तुटला आहे तेथे मदत पोहोचणे अवघड झालेले आहे देवळे ग्रामपंचायत येथील स्थानिक कार्यकर्ते  अनिल दळवी रवी केसरकर किसन रिंगे उपसरपंच शंकर केसरकर तुकाराम पवार पांडुरंग मोरे , आनंद केसरकर ,माजी सरपंच प्रकाश कदम हे पायपीट करून कशीतरी या गावाला पोहोचले त्यावेळी तेथील भीषण वास्तविकता समोर आले. दरम्यान प्रांत अधिकारी प्रतिमा पुदळवाड यांनी या गावची  अडचण लक्षात घेवून तातडीने मंडळ अधिकारी अजय जाधव तलाठी वैराले यांच्यासमवेत भूगर्भ तज्ञांना दाभिल येथे पाठवण्यात आले आहे 

टॅग्स :landslidesभूस्खलनkolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस