डी. वाय. पाटीलच्या प्राध्यापकांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:28+5:302021-02-05T07:07:28+5:30
हा शोधनिबंध ‘एलसवेर’ या प्रकाशनाने प्रसिद्ध केला. ॲल्युमिनियम उत्पादन करताना तयार झालेल्या ‘रेड मड’ या टाकाऊ मटेरियलचा काँक्रिटमध्ये ...

डी. वाय. पाटीलच्या प्राध्यापकांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय
हा शोधनिबंध ‘एलसवेर’ या प्रकाशनाने प्रसिद्ध केला. ॲल्युमिनियम उत्पादन करताना तयार झालेल्या ‘रेड मड’ या टाकाऊ मटेरियलचा काँक्रिटमध्ये यशस्विरीत्या वापरता येईल हे या संशोधनातून सिद्ध झाले. त्यामुळे तुलनेने स्वस्त काँक्रिट तयार करता येईल त्याचबरोबर पर्यावरणाची हानीही थांबू शकेल.
प्राध्यापक शिवप्रसाद चव्हाण हे या शोधनिबंधाचे मुख्य लेखक असून डॉ. किरण माने, प्रा. सुदर्शन साळोखे, प्रा. पवन नाडगौडा, प्रा. सुचिता पाटील-चव्हाण हे सहलेखक आहेत. या सर्व प्राध्यापकांना सिव्हील विभागप्रमुख प्रा. अभय जोशी, प्राचार्य डॉ. एस. आर. चेडे, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील आणि विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी या यशाबद्दल सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.
फोटो २९ डीवाय पाटील प्राध्यापक
ओळी...... डी. वाय. पी अभियांत्रिकीच्या संशोधक प्राध्यापकांचे अभिनंदन करताना कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता.यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. अभय जोशी आदी उपस्थित होते.