पूरग्रस्त वारांगणांच्या मदतीला धावले ‘सायबर’चे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 06:47 PM2019-08-17T18:47:59+5:302019-08-17T18:49:16+5:30

सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत पूरग्रस्त भागातील वारांगणांना विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. विभागात शिकणाऱ्या विद्यार्र्थ्यांनी वारांगणा सखी संघटनेच्या माध्यमातून सुमारे २५ वारांगणांपर्यंत ही मदत पोहोचविली. या विद्यार्थ्यांना राखी बांधून या मदतीबद्दल या वारांगणांनी अनोख्या पद्धतीने त्यांचे धन्यवाद मानले.

'Cyber' students rush to help flood victims | पूरग्रस्त वारांगणांच्या मदतीला धावले ‘सायबर’चे विद्यार्थी

कोल्हापुरात ‘सायबर’च्या समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त भागातील वारांगणांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

Next
ठळक मुद्देपूरग्रस्त वारांगणांच्या मदतीला धावले ‘सायबर’चे विद्यार्थीअनोखे राखीबंधन, समाजकार्य विभागाकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

कोल्हापूर : सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत पूरग्रस्त भागातील वारांगणांना विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. विभागात शिकणाऱ्या विद्यार्र्थ्यांनी वारांगणा सखी संघटनेच्या माध्यमातून सुमारे २५ वारांगणांपर्यंत ही मदत पोहोचविली. या विद्यार्थ्यांना राखी बांधून या मदतीबद्दल या वारांगणांनी अनोख्या पद्धतीने त्यांचे धन्यवाद मानले.

सायबर महाविद्यालयाच्या या विभागातील विद्यार्र्थ्यांनी आतापर्यंत स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. विद्यार्थ्यांच्या या विधायक उपक्रमाचे डॉ. दीपक भोसले यांनी कौतुक केले आहे. डॉ. प्रकाश रणदिवे यांनी याप्रसंगी वारांगणा सखी संघटनेसोबतची राखीपौर्णिमा ही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

प्रारंभी वारांगणा सखी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्षा जयश्री मोरे यांनी तसेच उपस्थित संघटनेच्या सदस्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्र्थ्यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. यावेळी वारांगणा सखी संघटनेचे व्यवस्थापक आयूब सुतार, उमेश निरंकारी उपस्थित होते.

महेंद्र जनवाडे आणि श्रुतिका जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी पौर्णिमा गुरव, सिद्धी भाईशेट्टे, अपेक्षा खांडेकर, प्रदीप गुरव, ऐश्वर्या जगदाळे, गौरी भोसले, तेजश्री हुडीद, समीना देसाई, ऐश्वर्या शिंदे, हर्षवर्धन देसाई, धनंजय कुलकर्णी, अभिषेक पाटील, स्वप्निल गोजेकर, शामराव निंबाळकर, विशाल वाघमारे, जयकुमार सोनोलकर, धैर्यशील चौगुले, संकेत मोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमात ‘सायबर’चे सचिव डॉ. रणजित शिंदे, संचालक डॉ. एम. एम. अली आणि विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. शिरोळ यांनी मार्गदर्शन केले.

 

 

Web Title: 'Cyber' students rush to help flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.