शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यापाड्यातील ग्राहक होतोय अपडेट; कोल्हापूर जिल्हा बँकेचा ७ हजार कोटींचा डिजिटल व्यवहार

By राजाराम लोंढे | Updated: February 18, 2026 18:31 IST

ऑनलाईन व्यवहार वाढला, बँकेतील ग्राहक कमी झाला

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (केडीसीसी) चालू आर्थिक वर्षातील दहा महिन्यांत ग्राहकांनी तब्बल ७ हजार ७१६ कोटींचा डिजिटल व्यवहार केला आहे. यामध्ये सर्वाधिक ४,२९७ कोटी मोबाईल बँकिंग व्यवहार झाले आहेत. खेड्यापाड्यातील ग्राहक अपडेट होत असून, ऑनलाईन व्यवहार वाढल्याने ग्राहक बँकांच्या शाखेत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!जिल्हा बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बँकेच्या बहुतांश शाखा या छोट्या छोट्या गावांत आहेत. पण, गेल्या तीन-चार वर्षांपासून बँकेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकांना अद्ययावत सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. हे ओळखून ‘मोबाईल बँकिंग’, ‘यूपीआय’, ‘मायक्रो एटीएम’, ‘क्यूआर कोड’, ‘ए.टी.एम.’ आदी सुविधा बँकेने ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेचे ९ लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत, त्यापैकी ७५ टक्के ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे या सुविधांचा वापर ग्रामीण ग्राहक किती ताकदीने करणार याविषयी सुरुवातीला साशंकता होती. पण, बँकेच्या यंत्रणेने नियोजनबद्ध ग्राहकांपर्यंत सुविधा पोहोचवल्या. सुरुवातीच्या टप्प्यात याेजनांना अल्प प्रतिसाद मिळाला, पण चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केले.पाच लाख ग्राहकांना ‘एसएमएस’ अलर्टजिल्हा बँकेशी नऊ लाखांहून अधिक ग्राहक कार्यरत आहेत. त्यापैकी ५ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी ‘एसएमएस’ अलर्ट ही सेवा घेतली आहे. ऑनलाईन व्यवहार झाल्यानंतर तात्काळ मेसेज द्वारे त्याची माहिती ग्राहकांना होते.

या आर्थिक वर्षात असा झाला डिजिटल व्यवहारसुविधा  - संलग्न ग्राहक - उलाढाल

  • मोबाईल बकिंग - ७७ हजार २१३ - ४२९७ कोटी
  • युपीआय  - १ लाख १९ हजार - ३१८२ कोटी
  • मायक्रो एटीएम - ५१ हजार ११३  - ८४ कोटी
  • क्यूआर कोड - १० हजार २८१ - १५३ कोटी

बँकिंग स्पर्धेत राहण्याबरोबरच ग्राहकांचा वेळ व पैशाची बचत व्हावी, यासाठी डिजिटल व्यवहार खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत बँकेने खूप वेगाने वाटचाल करत ग्राहकांना जलद सेवा दिली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुविधा वापर करावा. - जी.एम. शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur District Bank Sees ₹7,000 Crore in Digital Transactions

Web Summary : Kolhapur District Bank witnesses ₹7,716 crore digital transactions in ten months, driven by mobile banking. Rural customers are embracing online facilities, reducing branch visits. The bank offers mobile banking, UPI, micro ATMs and QR codes to its nine lakh customers, enhancing convenience and saving time.