शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची ईर्षा पुणे, साताऱ्यात, ट्रॅव्हल्सनी ट्रॅफिक जाम कोल्हापुरात; पोलिसांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:20 IST

Local Body Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांसाठी देवदर्शन सहली सुरू

कोल्हापूर : नगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील इच्छुक उमेदवारांकडून मतदारांसाठी देवदर्शन सहली सुरू आहेत. सोमवारी शहरात पुणे, साताऱ्यातील एकाच वेळी १२० खासगी ट्रॅव्हल्स आल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नागरिक हैराण झाले, तर वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची तारांबळ उडाली.निवडणुकांपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अनेक फंडे वापरले जातात. यातीलच एक प्रचलित प्रकार म्हणजे मतदारांना देवदर्शनाच्या सहली घडविल्या जातात. सातारा आणि पुणे जिल्ह्यातून सोमवारी सकाळी ४० ट्रॅव्हल्स कोल्हापुरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खानविलकर पेट्रोलपंप येथील १०० फुटी रोडवर पार्किंगची व्यवस्था केली होती. त्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातून ८० आणि सातारा जिल्ह्यातून ४० अशा एकूण १२० ट्रॅव्हल्स सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचल्या.एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे दसरा चौक ते खानविलकर पेट्रोलपंप आणि कसबा बावडा रोडवर वाहतूककोंडी झाली. यातच जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या दौलत कारखाना मोर्चामुळेही गर्दीत भर पडली. यामुळे कसबा बावडा ते सीपीआर चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर नागरिकांना पुढे जाणे मुश्कील झाले.

अंबाबाईसह जोतिबा, बाळूमामाचे दर्शनखानविलकर पेट्रोलपंप परिसर, पंचगंगा नदी घाट, एस्तर पॅटर्न हायस्कूल आणि दसरा चौकात ट्रॅव्हल्स पार्क करून वाहतूककोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यानंतर सातारा आणि पुण्यातून आलेल्या भाविक मतदारांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. कोल्हापुरातील दर्शनानंतर ही वाहने आदमापूर आणि ज्योतिबा दर्शनासाठी रवाना झाली.

मतदारांची वर्दी, शहरात गर्दीनिवडणुकीचे वातावरण तापत असल्याने येणाऱ्या दोन आठवड्यांत देवदर्शनासाठी सहलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांना पार्किंगचे नियोजन करावे लागणार आहे. कोल्हापूरसह आदमापूर आणि ज्योतिबा डोंगर येथेही वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Election Fever: Pune, Satara Voters Cause Kolhapur Traffic Chaos

Web Summary : Ahead of local elections, Kolhapur faced traffic jams as 120 private travels carrying voters from Pune and Satara arrived for religious tours. Police struggled to manage the congestion near temples like Ambabai and Jotiba. More such trips are expected, requiring better traffic management.