पन्हाळा : पन्हाळा शहरात रविवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी तीन वेळेस हजेरी लागल्याने पर्यटकांची तुडुंब गर्दी झाली होती. रविवारी पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत पाऊस हलक्या स्वरूपात झाला. त्यानंतर कडकडीत ऊन पडले, दुपारी तीन वाजता पुन्हा पाऊस पडला व सायंकाळी पाच वाजता पुन्हा जोरदार तासभर पाऊस पडला. पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. त्यानंतर पर्यटकांची भरपूर गर्दी झाली.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता वीस मिनिटे जोरदार झालेल्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी गटारी झाडांच्या पाल्याने तुंबलेल्या होत्या. तोच अनुभव रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुन्हा गटारी तुंबल्याने संपूर्ण शहरात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडाली. सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे पर्यटकांची गर्दी झाल्याने लहानमोठ्या व्यावसायिकांची चांगलीच उलाढाल झाली. तर नगरपरिषदेला प्रवासी कर व कार पार्किंगमध्ये अंदाजे दीड लाखाचे उत्पन्न मिळाले.
Kolhapur: पन्हाळगड गर्दीने फुलला, पावसाने तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:53 IST