कोल्हापूर : शहरात गुरुवारी काही पेट्रोलपंपांवर ग्राहकांच्या रांगा लागल्या. तर काही ठिकाणी पेट्रोल, डिझेल बंदचे फलक लावण्यात आले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दिवसभर पेट्रोलपंपांवरील गर्दीची रांग कमी झाली. शहरातील पेट्रोलपंपांवरील गर्दी काही ठिकाणी कमी झाली, तर उपनगरातील पेट्रोलपंपांवर सकाळी काही प्रमाणात गर्दी झाली. दुपारनंतर मात्र ही गर्दी तुरळक राहिली.प्रशासनाने इंधनाचा मुबलक साठा असून वाहनधारकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. त्यानुसार बहुतांशी पेट्रोलपंप मालकांकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध होता. बुधवारच्या तुलनेत दोन ते तीन तास वाहनधारकांना रांगेत थांबावे लागले नाही. काही पंपचालकांनी तीन स्वतंत्र रांगा करून गर्दीवर नियंत्रण मिळविले. प्रत्येक दुचाकी वाहनात २०० रुपयांचे आणि चारचाकी वाहनात २ हजार रुपयांचे पेट्रोल दिले.दुपारी कसबा बावडा रोड, पार्वती टॉकीज, दाभोळकर कॉर्नरजवळील पेट्रोलपंप बंद राहिले. राजारामपुरी, देवकर पाणंद, मध्यवर्ती बसस्थानक, फुलेवाडी, बालिंगा, आपटेनगर, साळोखेनगरसह अन्य पेट्रोल, डिझेल विक्रीचे पंप सुरू राहिले. या पंपांवर वाहनधारकांची तुरळक गर्दी राहिली. देवकर पाणंद पंपावर सकाळपासूनच रांगा केल्याचे चित्र होते. मात्र, दुपारनंतर ही गर्दी कमी झाली. उपनगरात वाहनधारकांची गर्दी झाल्याने पंप व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले. काहींनी आज संपले आहे, उद्या पेट्रोल मिळेल, असेही फलक लावले.
बाटल्यांना बंदीकाही पंपांवर लोक प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन घेऊनही आले होते. मात्र, त्यांना पंपावरील कर्मचाऱ्यांनी हटकले.
फक्त रोख द्याकाही वाहनधारकांनी पंपावर इंधन भरल्यानंतर पैसे देण्यासाठी स्कॅन कोड मागितला. डेबिट आणि क्रेडिट कार्डची मागणी केली. मात्र, बहुतांशी पंपावर कर्मचाऱ्यांनी रोख पैसे मागितल्याने काही वाहनधारकांची कोंडी झाली. पंपधारकांनी त्याबाबतचा फलक लावण्याची गरज होती, असे काही वाहनधारकांनी सांगितले.
सिलिंडरच्या रांगाघरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांनी तिसऱ्या दिवशीही गॅस एजन्सीच्या दारात सिलिंडर ठेवून रांगा केल्या. संभाजीनगर येथील एका एजन्सीच्या दारात शंभरहून अधिक सिलिंडर रांगेत ठेवले होते. शहरातील अन्य एजन्सींतही काही प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. घरपोच सिलिंडर दिले जाईल, असे एजन्सी कर्मचाऱ्यांनी सांगताच काही ग्राहकांचे वाद झाले.
Web Summary : Fuel panic buying decreased in Kolhapur, but some stations demanded cash only. This inconvenienced customers seeking to use cards or digital payments. Cylinder queues persisted.
Web Summary : कोल्हापुर में ईंधन की आपाधापी कम हुई, लेकिन कुछ स्टेशनों ने केवल नकद की मांग की। इससे कार्ड या डिजिटल भुगतान का उपयोग करने वाले ग्राहकों को असुविधा हुई। सिलेंडर की कतारें जारी रहीं।