जनता दलाच्या पाठिंब्यामुळे ‘मॅजिक फिगर’ ओलांडली : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 06:49 PM2021-11-24T18:49:58+5:302021-11-24T18:50:54+5:30

गडहिंग्लज : जनता दलाच्या एकमुखी पाठिंब्यामुळेच ‘२७०’ ही मॅजिक फिगर आपण ओलांडली आहे. त्यांच्या विश्वासाला आपण कदापिही तडा जावू ...

Crossed the 'magic figure' with the support of Janata Dal: Satej Patil | जनता दलाच्या पाठिंब्यामुळे ‘मॅजिक फिगर’ ओलांडली : सतेज पाटील

जनता दलाच्या पाठिंब्यामुळे ‘मॅजिक फिगर’ ओलांडली : सतेज पाटील

googlenewsNext

गडहिंग्लज : जनता दलाच्या एकमुखी पाठिंब्यामुळेच ‘२७०’ ही मॅजिक फिगर आपण ओलांडली आहे. त्यांच्या विश्वासाला आपण कदापिही तडा जावू देणार नाही. गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनता दलासोबत हातात हात घालून काम करू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज नगरपालिकेतील सत्ताधारी जनता दलाच्या १५ नगरसेवकांनी विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री पाटील यांना आज, बुधवारी (२४) जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सतेज पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुनिल शिंदे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील तालुक्याच्या सर्व ठिकाणांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यासाठी सुमारे ७०० कोटींचा निधी आपण दिला आहे. म्हणूनच गट-तट बाजूला ठेवून प्रत्येक तालुक्यातील मतदार आपल्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत.

नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, गेल्यावेळी काही कारणास्तव आम्ही पाटील यांच्यासोबत नव्हतो. परंतु, गडहिंग्लज नगरपालिकेचे काही प्रश्न सुटावेत आणि शहराच्या विकासासाठी पाठबळ मिळावे म्हणूनच यावेळी पालकमंत्र्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Crossed the 'magic figure' with the support of Janata Dal: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.