हेब्बाळ येथे मगरींचे दर्शन,काठावरील गावांना सावधानतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:56 IST2020-08-31T11:55:12+5:302020-08-31T11:56:49+5:30
हेब्बाळ-कसबा नूल (ता. गडहिंग्लज )येथील नळयोजनेच्या जॅकवेलनजीक दोन मगरींचे दर्शन झाले.त्यामुळे प्रशासनातर्फे हिरण्यकेशी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेब्बाळ येथे मगरींचे दर्शन,काठावरील गावांना सावधानतेचा इशारा
ठळक मुद्देहेब्बाळ येथे मगरींचे दर्शनकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा
गडहिंग्लज - हेब्बाळ-कसबा नूल (ता. गडहिंग्लज )येथील नळयोजनेच्या जॅकवेलनजीक दोन मगरींचे दर्शन झाले.त्यामुळे प्रशासनातर्फे हिरण्यकेशी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी (२८) हरळी येथील नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोध मोहीमे दरम्यान हेब्बाळनजीक मगरी दिसल्या होत्या. वनविभागाचे अधिकारी व ग्रामस्थांनी हेब्बाळ ते मुगळी दरम्यान मगरींचा शोध घेण्यात आला. परंतु,त्यांचे दर्शन झाले नाही.