शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त पैसे घेणाऱ्या डॉक्टरांवर फौजदारी करा

By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST

जनशक्ती संघटना : जीवनदायी योजनेच्या समन्वयकांकडे मागणी

कोल्हापूर : शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून फेरतपासणी व अन्य तपासण्यांच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या डॉक्टारांवर फौजदारी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जनशक्ती संघटनेच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांना आज, गुरुवारी सीपीआर रुग्णालयात धारेवर धरले होते. या योजनेची माहिती सर्वसामान्य रुग्णांना दिली जात नाही. त्याचबरोबर ज्या २८ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना लागू केली आहे, त्या ठिकाणी रुग्णांची अर्थिक पिळवणूक केली जात आहे. या योजनेंतर्गत ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया व १२१ प्रकारच्या फेरतपासण्या पूर्णपणे मोफत आहेत. मात्र, रुग्णांकडून नियमबाह्यरीत्या आगाऊ व अतिरिक्त पैसे भरून घेतले जाते आहेत. अशा रुग्णालयांवर आणि डॉक्टारांवर जिल्हा समन्वयक म्हणून कारवाई करा, अशी मागणी जनशक्तीच्यावतीने करण्यात आली. याबाबत बोलताना डॉ. देठे यांनी, तुम्ही या डॉक्टरांविरोधात जर पुरावा देत असाल, तर फौजदारी गुन्हे दाखल करू व ज्या दवाखान्यांबाबत तक्रार असेल तर त्या दवाखान्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जनशक्तीचे समीर नदाफ, रियाज कागदी, राजन पाटील, नसीर गवंडी, तय्यब मोमीन, राजेश माने, मालोजी केरकर, आदी उपस्थित होते. ——————-