नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या ३ मंडळांवर गुन्हे, डॉल्बी मिक्सर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:35 IST2017-08-26T23:35:12+5:302017-08-26T23:35:50+5:30
राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या, एकता तरुण मंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा अध्यक्ष रहीम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉइज या मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल करून डॉल्बीचे मिक्सर जप्त केले.

नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या ३ मंडळांवर गुन्हे, डॉल्बी मिक्सर जप्त
कोल्हापूर : राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या, एकता तरुण मंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा अध्यक्ष रहीम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉइज या मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल करून डॉल्बीचे मिक्सर जप्त केले.
संबंधित मंडळांवर कठोर कारवाईसाठी मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण, वृत्तपत्रांतील बातम्या, छायाचित्रे यांचा आधार घेत, तसेच सरकारी पंचांची साक्ष घेऊन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात सादर केले जाणार आहे, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शनिवारी दिली.