वृद्ध दाम्पत्याचा सांभाळ न करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:59+5:302021-01-22T04:22:59+5:30
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील बंडू गोविंद पाटील (वय ८१) यांनी, आपला सांभाळ न करता शारीरिक व ...

वृद्ध दाम्पत्याचा सांभाळ न करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील बंडू गोविंद पाटील (वय ८१) यांनी, आपला सांभाळ न करता शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या कारणावरून आपल्या मुलासह, सुना व नातवंडे यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
फिर्यादी बंडू गोविंद पाटील हे सध्या त्यांचे जावई बाबासाहेब धोंडीराम जामदार (रा. कोपार्डे ) येथे राहतात. पत्नी सोनाबाई पाटीलसह ते गावी आल्यानंतर त्यांचा मुलगा, सुना, नातवंडे यांनी त्यांचा सांभाळ न करता, घरात राहू नये म्हणून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ ते करत होते. त्यामुळे जयवंत बंडू पाटील, शोभा जयवंत पाटील, श्रीमती पद्मा आकाराम पाटील, कल्पना आकाराम पाटील, नातू पंकज आकाराम पाटील, राहुल आकाराम पाटील (सर्व रा. काटेभोगाव) यांच्यावर ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण २००७ नुसार गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास कळे पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एस. टी. धनवडे करत आहेत.