शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगड जाळपोळप्रकरणी संभाजीराजेंसह ५०० जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:24 IST

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर ) येथील अतिक्रमण काढताना जाळपोळ, हिंसाचार केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे, हिंदू बांधव ...

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील अतिक्रमण काढताना जाळपोळ, हिंसाचार केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे, हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह ५०० हून अधिक जणांवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले.विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला रविवारी (दि.१४) हिंसक वळण लागले. त्यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये मुस्लीम समाजाच्या घरांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी सोमवारी २१ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण घटनेला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संभाजीराजे, पुण्यातील रवींद्र पडवळ यांच्यासह ५०० हून अधिक जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या घटनेत सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.दरम्यान, खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी विशाळगडाजवळील गजापूर येथे जात नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आम्हाला पोटाशी धरले, जमिनी दिल्या, त्यांच्या वारसाने जमाव गोळा करावा आणि आमचा काहीच दोष नसताना, भीतीने गप्प घरात बसलो असताना आमचे जगणेच उद्ध्वस्त करावे याबद्दलचा उद्वेग मुस्लीम समाजाने त्यांच्यासमोर व्यक्त केला.

१०० मिळकतींचे अतिक्रमण काढलेजिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, गेल्या दोन दिवसांत १०० मिळकतींचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. कारवाईनंतर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, मलबा खाली आणला जाईल. पावसाळा असल्याने रहिवासी अतिक्रमण काढले जाणार नाही. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढले जात आहे. काही जणांनी स्वत:हून त्यासाठी मदत केली आहे.

शांततेला प्राधान्य : देवेंद्र फडणवीसमुंबई : विशाळगडावरचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात हे कायद्याने झाले पाहिजे, नियम पाळून झाले पाहिजे ही सरकारची भावना आहे. त्यामुळे तशा पद्धतीने कारवाई होईल. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी करता येईल, याला आमची प्राथमिकता आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस