विनयभंगप्रकरणी शेणगावच्या युवकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:37 IST2020-10-06T10:34:58+5:302020-10-06T10:37:27+5:30
crimenews, kolhapur, molestation case स्टेशन रोडवर तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील युवकावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल रामचंद्र घोडके (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

विनयभंगप्रकरणी शेणगावच्या युवकावर गुन्हा
कोल्हापूर : स्टेशन रोडवर तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील युवकावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल रामचंद्र घोडके (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्टेशन रोडवरून एक तरुणी पायी जात असताना स्वप्निल घोडके हा तरुण दुचाकीवरून आला. त्याने तिला व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर चौक दरम्यान तीर्थ प्लाझा येथे अडवून चल येतीस का? असे विचारले.
पण, त्या तरुणीने त्याकडे दुर्लक्ष करीत ती पुन्हा पुढे गेली, त्यावेळी स्वप्निलने पुन्हा तिचा पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे अपशब्द वापरून तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी संबंधित तरुणीने थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. तेथे स्वप्निल घोडके याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार त्याच्यावर रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.