युवतीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा,यादवनगरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:13 IST2020-05-12T19:12:09+5:302020-05-12T19:13:34+5:30
यादवनगरातील नवीन वसाहतीमध्ये एका मंडळाच्या कट्ट्यावर बसलेल्या तरुणीला येथे का बसलात म्हणून तिला शिवीगाळ करून तिच्याशी झटापट करून विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संतोष सुरेश माळी (वय २३, रा. नवी म्हाडा कॉलनी, कोटीतीर्थ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून आपल्यावर चाकूहल्ला केल्याची तक्रार संशयित आरोपींनी पोलिसांकडे केली आहे, त्या प्रकरणी चौघांवर गुन्हा नोंदविला आहे.

युवतीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा,यादवनगरातील प्रकार
कोल्हापूर : यादवनगरातील नवीन वसाहतीमध्ये एका मंडळाच्या कट्ट्यावर बसलेल्या तरुणीला येथे का बसलात म्हणून तिला शिवीगाळ करून तिच्याशी झटापट करून विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संतोष सुरेश माळी (वय २३, रा. नवी म्हाडा कॉलनी, कोटीतीर्थ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून आपल्यावर चाकूहल्ला केल्याची तक्रार संशयित आरोपींनी पोलिसांकडे केली आहे, त्या प्रकरणी चौघांवर गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी ही नवी म्हाडा कॉलनी येथील रहिवासी आहे. सोमवारी (दि. ११) दुपारी त्या आपल्या मैत्रिणींबरोबर तेथील एका सार्वजनिक मंडळाच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. यावेळी संतोष तेथे आला. तुम्ही इथे का बसता? असा जाब त्याने त्या तरुणींना विचारला. त्यानंतर चिडलेल्या संतोषने त्यांना शिवीगाळ केली. त्यांतील एका तरुणीला जवळ ओढून तिच्याशी झटापट करुन लज्जा उत्पन्न होईल असा प्रयत्न केला.
झटापटीत त्या तरुणीचा शर्ट फाटला. घाबरलेल्या त्या तरुणींनी तेथून पळ काढला. त्याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संतोष माळीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या तक्रारीत विनयभंगासह, संशयित आरोपीने स्टिकने स्वत:च्या डोक्यात मारून जखमी करून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, संतोष माळी यानेही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये चौघांनी घरासमोर येऊन आपल्यावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात उमेश साळुंखे, जुबेर महांबरी, अमन बागवान, इर्शाद बागवान (सर्व रा. यादवनगर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.