हॉटेलमालकांकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:25 IST2019-06-05T10:23:58+5:302019-06-05T10:25:24+5:30

हॉटेलमध्ये तोडफोड करण्याची धमकी देऊन हॉटेलमालकाकडून तीन हजार रुपयांची खंडणी मागणारा नितीन नाईक ऊर्फ डेव्हिड (वय २५, रा. शाहूनगर, राजारामपुरी) याच्याविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Crime against those seeking a ransom in hoteliers | हॉटेलमालकांकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

हॉटेलमालकांकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

ठळक मुद्देशाहूनगर चौकातील घटना संशयिताने फोडला हॉटेलमधील डिस्प्ले काउंटर

कोल्हापूर : हॉटेलमध्ये तोडफोड करण्याची धमकी देऊन हॉटेलमालकाकडून तीन हजार रुपयांची खंडणी मागणारा नितीन नाईक ऊर्फ डेव्हिड (वय २५, रा. शाहूनगर, राजारामपुरी) याच्याविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शाहूनगर चौकातील हॉटेल विकास बार व रेस्टॉरंटमध्ये सोमवारी (दि. ३) सकाळी हा प्रकार घडला. हॉटेल कामगार सुनील गोविंद म्हेतर (वय २६ रा. खोकुर्ले, पडवळवाडी, गगनबावडा ) याने फिर्याद दिली आहे.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विनायक सूर्यवंशी यांचे शाहूनगर चौकात हॉटेल आहे. सोमवारी संशयित आरोपी नितीन नाईक ऊर्फ डेव्हिड याने हॉटेलमध्ये येऊन मालक सूर्यवंशी यांच्याकडे तीन हजारांच्या खंडणीची मागणी केली.

‘मागेल तेव्हा पैसे दिले नाहीत तर हॉटेलची वाट लावीन,’ अशी धमकीही दिली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामगार सुनील म्हेतर याला ‘तुझ्या मालकाला फोन लाव,’ म्हणत त्याने हातातील दगड डिस्प्ले काउंटरवर मारून डिस्प्ले फोडला.

तसेच काउंटरजवळ असलेल्या दोन बाटल्या फोडून १५ हजार रुपयांचे नुकसान केले. हॉटेल कामगार सुनील म्हेतर याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नितीन नाईक ऊर्फ डेव्हिड याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 

Web Title: Crime against those seeking a ransom in hoteliers