ट्रकचालक आत्महत्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:36+5:302020-12-15T04:41:36+5:30

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालेवाडी येथील ओंकार इंदुलकर या तरुणाने ६ डिसेंबरला शिरोली एमआयडीसी देसाई पेट्रोल पंपाच्या ...

Crime against both in truck driver suicide case | ट्रकचालक आत्महत्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

ट्रकचालक आत्महत्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालेवाडी येथील ओंकार इंदुलकर या तरुणाने ६ डिसेंबरला शिरोली एमआयडीसी देसाई पेट्रोल पंपाच्या शेजारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ओंकार इंदुलकर याने संशयित आरोपी पाटील व शिंदे यांच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये किमतीला ट्रक खरेदी केला होता. त्यातील साडेतीन लाख रुपये रोख दिले होते. उर्वरित रकमेचे ट्रकवर एचडीबी फायनान्स कंपनीचे कर्ज होते. त्याचा दरमहा ४४४९४ इतका हप्ता ठरलेला होता; पण लॉकडाऊनच्या काळात हप्ते भरण्यासाठी सवलत दिली होती.

तरीदेखील पाटील व शिंदे यांनी इंदुलकर यांच्या ताब्यात असलेला ट्रक ओढून आणला होता आणि इंदुलकर यांच्याकडून घेतलेली रक्कम परत देण्यास वारंवार टाळाटाळ केली होती. त्यामुळे इंदुलकर मानसिक तणावामध्ये गेला होता. याच कारणामुळे आपल्या भावाने आत्महत्या केली आहे. त्यास युवराज पाटील व सुधीर शिंदे हे दोघे जबाबदार आहेत म्हणून इंदुलकर यांची बहीण स्वरुपा हिने शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले पुढील तपास करत आहेत.

Web Title: Crime against both in truck driver suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.