शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सीपीआर रुग्णालय : दीड वर्षात पावणेचार हजारावर नेत्रशस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 10:57 IST

तानाजी पोवार कोल्हापूर : ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या म्हणीप्रमाणे दृष्टीचे महत्त्व आहे. गेल्या वर्षभरात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हे ...

ठळक मुद्देसीपीआर रुग्णालय : दीड वर्षात पावणेचार हजारावर नेत्रशस्त्रक्रियानेत्रप्रत्यारोपनाने ५८ जणांना मिळाली दृष्टी

तानाजी पोवारकोल्हापूर : ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या म्हणीप्रमाणे दृष्टीचे महत्त्व आहे. गेल्या वर्षभरात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविण्यास सुरू केल्यापासून राज्यभर मोतीबिंदू शस्त्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात गेल्या दीड वर्षांत सुमारे ३७६१ रुग्णांवर मोतिबिंदंूसह इतर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर ५८ जणांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया केल्याने त्यांना दृष्टी मिळाली.कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह सीमाभागातील रुग्णांचा भार सीपीआर रुग्णालयावर आहे. विविध रुग्णांवरील उपचारासह येथील नेत्र विभागाचे कामही कौतुकास्पद आहे. सीपीआर रुग्णालयात दरमहा सुमारे ३०० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात.

डोळ्याला मोतिबिंदू झालेला रुग्णाची तपासणी केल्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत त्या रुग्णावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. राष्टÑीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी औषध, उपकरणासाठी ठरावीक निधी प्राप्त होतो, त्या निधीतून या मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात.सीपीआर रुग्णालयात नेत्रतपासणी विभाग हा नेहमीच कार्यरत आहे. गेल्या वर्षी शासनाच्या वतीने मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात आले, त्यानंतर मोतिबिंदू शस्त्रक्रियेच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.

सीपीआर रुग्णालयात गेल्या वर्षभरात सुमारे २८३४ नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यामध्ये बहुतांशी मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा समावेश आहे, तर याच कालावधीत मृत्युपश्चात सुमारे ४२ नेत्रदान मिळाले, तर त्यांचे ४० रुग्णांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

नेत्रशस्त्रक्रियेसाठी राष्टÑीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून निधी मिळत असल्याने या शस्त्रक्रिया करण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत; पण रुग्णांची तपासणीअंती त्यांना पुढील चार दिवसांची वेळ देऊन या शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी योजनेतून मोफत केल्या जातात.वर्षे                नेत्रशस्त्रक्रिया            नेत्रदान            नेत्ररोपण२०१७-१८               १८१०                   ----               ----२०१८-१९               २८३४                    ४२                    ४०एप्रिल ते जुलै २०१९  ९२७                     १९                   १८

जनजागृतीसाठी प्रयत्न हवेतनेत्रदानाचे महत्त्व मोठे आहे, मृत व्यक्तीच्या डोळ्यांतून दोन अंधांना दृष्टी मिळून ते जग पाहू शकतात; त्यामुळे या नेत्रदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाच्या वतीने नेत्रदानाबाबत समाजात जनजागृतीसाठी आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनीही मानसिकता बदलून नेत्रदानाचे महत्त्व समजून घेण्याची आवश्यकता आहे.

नेत्रदानाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे; पण त्यासाठी मानसिकता अद्याप तयार झालेली नाही, शासनाच्या वतीने नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम घेतले जातात; पण नेत्रदान हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास बालमनापासूनच त्याची जागृती होण्यास मदत होईल.- डॉ. अतुल राऊत,नेत्रविभागप्रमुख, सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर. 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर