शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत दोषी आढळल्यास सीपीआरचे डॉक्टर्सही होणार बडतर्फ; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:43 IST

कोल्हापूर : दिव्यांग आणि आजारी प्रमाणपत्रांबाबत जर सीपीआरच्या डॉक्टर्सनी चुकीची प्रमाणपत्रे दिली असतील आणि त्यात ते दोषी आढळले तर ...

कोल्हापूर : दिव्यांग आणि आजारी प्रमाणपत्रांबाबत जर सीपीआरच्या डॉक्टर्सनी चुकीची प्रमाणपत्रे दिली असतील आणि त्यात ते दोषी आढळले तर त्यांना बडतर्फ करू, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ते शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलत होते.सीपीआरच्या डॉक्टरांनी ज्या प्राथमिक शिक्षकांना वैद्यकीय प्रमाणपत्रे दिली त्यांचीच प्रमाणपत्रे पुन्हा सीपीआरच्याच डॉक्टरांनी ‘इनकरेक्ट’ म्हणून दिली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, की एकूणच दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत राज्य स्तरावर धोरण ठरवले जात आहे. एखाद्याला एक डोळा नसला तर त्याला नेमके किती टक्के दिव्यांग म्हणून प्रमाणपत्र द्यायचे हे ठरवण्यासाठीच समिती नेमण्यात आली आहे. त्यानुसार हे काम सुरू आहे.जर सीपीआरच्या डॉक्टरांनी चुकीची प्रमाणपत्रे दिली असतील तर ते डॉक्टर्स बडतर्फ होतील, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, हे दिव्यांग प्रकरण तापण्याची चिन्हे असून, अजूनही १५ शिक्षकांची तपासणी जे. जे. हॉस्पिटल मुंबई आणि पुणे येथील ससून रुग्णालयात व्हायची असल्याने ते अहवालदेखील प्रलंबित आहेत.सीपीआरच्या डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्राचा शिक्षकाला त्रासजिल्ह्यातील एका शिक्षकाचा शुक्रवारी ‘लोकमत’ला फोन आला होता. त्यांनी सांगितले की, माझ्या मुलाला डोळ्याचा आजार असल्याने त्याचा एक डोळा बदलला आहे. त्यामुळे मी सीपीआरमधून पाच महिन्यांपूर्वी मुलाचे दिव्यांग प्रमाणपत्र घेतले. त्यावेळी डॉक्टरांनी १०० टक्क्याचे प्रमाणपत्र दिले. त्याचवेळी मी डॉक्टरांना म्हणालो की तुम्ही १०० टक्क्याचे प्रमाणपत्र देतात. बघा अडचणी येतील. काही होत नाही, असे त्यांनी सांगितले आणि आता त्याच प्रमाणपत्राचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आता मला मुलाला घेऊन मुंबईला जाण्यास सांगत आहेत. या सगळ्यात माझा काय दोष, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : CPR Doctors Face Dismissal for Faulty Disability Certificates: Minister

Web Summary : CPR doctors risk dismissal for issuing incorrect disability certificates, says Minister Hasan Mushrif. A state-level policy is being formulated to standardize disability assessments following complaints. Some teachers faced suspension due to conflicting CPR certifications, prompting further investigations in Mumbai and Pune.