शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआर, सावित्रीबाई फुले रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना चपाती-भाजी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या सद्यस्थितीत ग्रामीण भागातील अनेक रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवण मिळण्यासाठी ...

कोल्हापूर : कोरोनाच्या सद्यस्थितीत ग्रामीण भागातील अनेक रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवण मिळण्यासाठी कसरत होत आहे. सीपीआर आणि सावित्रीबाई फुले रुग्णालयांतील अशा गरजू लोकांना मोफत चपाती-भाजी पुरविण्याचा उपक्रम रविवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने सुरू करण्यात आला. पहिल्या दिवशी २५० जणांना चपाती-भाजी वाटप करण्यात आली.

येथील सीपीआर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चपाती-भाजीचे वितरण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या कठीण प्रसंगी भाजपकडून विविध स्वरूपातील सेवाकार्य केले जात आहे. त्याअंतर्गत असलेला हा उपक्रम रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चितपणे दिलासा देणारा असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. पहिल्या दिवशीच्या उपक्रमासाठी सचिन तोडकर, भगवानराव काटे यांचे सहकार्य लाभले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, विठ्ठल पाटील, गायत्री राऊत, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, दिग्विजय कालेकर आदी उपस्थित होते.

चौकट

रोज होणार वाटप

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. सीपीआर आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सोमवारपासून रोज सकाळी अकरा ते दुपारी बारा यावेळेत चपाती-भाजीचे वाटप केले जाईल. गृह अलगीकरण असलेल्यांसाठी टेलिमेडिसिन सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले.

फोटो (०९०५२०२१-कोल-चपाती भाजी वाटप (बीजेपी) : कोल्हापुरात रविवारी सावित्रीबाई फुले रुग्णालयात मोफत चपाती-भाजी वाटप उपक्रमाची सुरूवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शेजारी भगवानराव काटे, विजय जाधव, राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई आदी उपस्थित होते.