कोल्हापूर : सीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उचलला, लोकमतचा दणका, रुग्ण, नातेवाईकांकडून समाधान व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:20 IST2018-01-18T16:13:26+5:302018-01-18T16:20:31+5:30
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) जैव वैद्यकिय कचरा गुरुवारी उचलण्यात आला. याबाबत ‘लोकमत’ मध्ये ‘सीपीआरमध्ये जैव वैद्यकिय कचऱ्यांचे ढिग’ असे वृत्त प्रसिद्धीस झाले. याची गंभीर दखल घेऊन राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासनाने संबधित संस्थेला कचरा उठावण्याचे तत्काळ सूचना केल्या.

कोल्हापूर : सीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उचलला, लोकमतचा दणका, रुग्ण, नातेवाईकांकडून समाधान व्यक्त
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) जैव वैद्यकिय कचरा गुरुवारी उचलण्यात आला. याबाबत ‘लोकमत’ मध्ये ‘सीपीआरमध्ये जैव वैद्यकिय कचऱ्यांचे ढिग’ असे वृत्त प्रसिद्धीस झाले. याची गंभीर दखल घेऊन राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासनाने संबधित संस्थेला कचरा उठावण्याचे तत्काळ सूचना केल्या.
दिवसभर हा कचरा नेण्यासाठी वाहनाच्या पाच फेऱ्या झाल्या. जैव वैद्यकिय कचरा उठाव केल्यामुळे सीपीआरचे चकाचक झाले. कचरा उठावानंतर रुग्ण, त्यांचे नातेवाईक व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
सीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उठाव करण्याचा ठेका ‘नेचर इन निड’ या खासगी संस्थेला दिले आहे. गेली दहा महिने या संस्थेचे बिल थकीत राहिल्याने हा जैव वैद्यकिय कचरा उठावण्यात आला नव्हता.
त्यामुळे सीपीआरमधील अपघात विभाग, कासारी इमारतीमधील मुख्य शस्त्रक्रिया विभागाकडे जाणाऱ्या जिन्याजवळ तसेच नवजात शिशू बालक अतिदक्षता विभाग, दूधगंगा इमारतीच्या दारात व हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या दारात जैव वैद्यकिय कचऱ्यांच्या पिशव्यांचा ढीगच्या ढिग पडून होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.
याचा त्रास रुग्णांसह नागरिकांना होत होता. याबाबत ‘लोकमत’कडे काही सजग नागरिकांनी व्यथा मांडल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी दिवसभर उठावण्यात आलेला जैव वैद्यकिय कचरा कसबा बावडा झुम प्रकल्पात टाकण्यात आल्या.
संबधित संस्थेचे बिल थकीत होते.त्यामुळे जैव वैद्यकिय कचरा उठविला नव्हता. बुधवारी संबधित संस्थेला संपूर्ण बिल अदा करण्यात आले.
-डॉ.जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,
राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.