शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

"सीपीआर ' झाले हाऊसफुल: कोवीड सेंटर वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 3:32 PM

कोल्हापूरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढीचा वेग पहाता सरकारी रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे . जिल्हाला आधारवट ठरलेले छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आता कोरोनाग्रस्तांच्या संख्यने हाऊसफुल्ल झाले . हे रुग्णालय आता फक्त ' अत्यावस्थ रुग्ण कोवीड सेंटर ' म्हणून उपलब्ध होणार आहे .

ठळक मुद्दे"सीपीआर ' झाले हाऊसफुल: कोवीड सेंटर वाढणारसीपीआरमध्ये फक्त अत्यवस्थ कोरोनाग्रस्त

कोल्हापूर : कोल्हापूरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढीचा वेग पहाता सरकारी रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे . जिल्हाला आधारवट ठरलेले छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आता कोरोनाग्रस्तांच्या संख्यने हाऊसफुल्ल झाले . हे रुग्णालय आता फक्त ' अत्यावस्थ रुग्ण कोवीड सेंटर ' म्हणून उपलब्ध होणार आहे .

' सीपीआर'मध्ये एकूण २४९ बेड उपलब्ध आहेत, तर बुधवारी सायंकाळपर्यंत येथे सुमारे २३२ कोरोनाग्रस्तावर उपचार सुरु होते . त्यामुळे जिल्ह्यात आता आणखी कोवीड सेंटर वाढवण्याच्या प्रशासकिय पातवर हालचाली सुरु झाल्या आहेत . कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने कहर होऊ लागला आहे . कोरोना रुग्णांचा वाढता वेग पहता ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे . कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय सद्या मुख्य कोवीड सेंटर बनले आहे .

जिल्ह्यातील बहुतांशी कोरोनाग्रस्त रुग्णावर येथे उपचार केले जातात . पण गेल्या पंधरा दिवसात कोरोनाग्रस्ताची झपाट्याने वाढती संख्या पहाता हे सीपीआर रुग्णालय कोरोना रुग्णासाठी अपुरे पडू लागले आहे . त्यामुळे सीपीआरसह डॉ . डी . वाय . पाटील हॉस्पीटल व इचलकरंजीचे आयजीएम रुग्णालय ही तीन रुग्णालये फक्त अत्यावस्त कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध होणार आहेत . सद्यस्थितीत संपूर्ण सीपीआर रुग्णालयात हे कोबीड सेंटर केले आहे . सीपीआरमध्ये २४ ९ बेड आहेत . तर सुमारे २३२ कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत . त्यामुळे हे रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे . जिल्ह्यात कोवीड सेंटर वाढविण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत .कोवीड सेंटर वाढविणारसीपीआर , डॉ . डी . वाय . पाटील , आयजीएम सह एकूण २१ कोवीड सेंटर आहेत . या सर्व ठिकात्रणी काही कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहेत. पण आता मुख्य सरकारी रुग्णालय कमी पडू लागल्याने ग्रामीण भागातही आता कोवीड सेंटर वाढवावे लागणार आहेत, त्या दृष्टीने प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.सर्वच रुग्णबेडला ऑक्सीजन सोयज्या कोरोनाग्रस्तांना लक्षणे नाहीत अशाची व्यवस्था इतर कोवीड सेंटरमध्ये करण्यात येणार असून फक्त अत्यावस्थ कोरोनागस्तावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत . सद्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालय सीपीआरमध्ये अत्यावस्य रुग्णांसाठी ३२ व्हॉटेलेटर उपलब्ध आहेत . त्यापैकी ५० व्हेंटिलेटर "आसीयु"मध्ये आहेत . तर सुमारे २४ ९ म्हणजेच सर्वच बेडला ऑक्सीजनची सोय करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.लॉकडाऊनमध्ये अडकले तंत्रज्ञसंपूर्ण सीपीआर ' आयसीयु ' करण्यात येणार आहे . त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची मागणी केली आहे . चार दिवसापूर्वी जादा १० व्हेंटिलेटर आले आहेत . पण लाँकडाऊनमध्ये तंत्रज्ञ आडकले असल्याने ते जोडणे बाकी आहे . अचानक संख्या वाढली , तर गंभीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो . ही बाब विचारात घेऊन नव्याने आलेले व्हेंटिलेटर तातडीने बसविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत .

कोरोना रुग्णांची दिवसागणीक वाढ ही धोकादायक आहे , त्यासाठी संपूर्ण सीआर रुग्णातय "आयसीयु ' करण्यात येणार आहे . त्यादृष्टीने आवश्यक यंत्रसामग्रीसाठी पाठपुरावा सुरु आहे .- डॉ .जयश्री घोरपडे, अधिष्ठाता, रा.छ.शा. म . शा . वैद्यकिय महाविद्यालय , कोल्हापूर

 

  • सीपीआरमध्ये बेड संख्या : २४९ , कोरोना पेशंट संख्या २३२
  • सीपीआरमध्ये सद्या व्हेंटिलेटर संख्या : ३२
  •  जिल्ह्यात कोवीड सेंटर : २१
  • कोवीड सेंटर संख्या वाढणार
  • सीपीआरसह आयजीएम , डॉ . डी . वाय . पाटील रुग्णालयही होणार ' आयसीयु"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर