पन्हाळ्यावर दिवसभर गव्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:48 IST2019-04-06T17:47:29+5:302019-04-06T17:48:20+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पन्हाळा शहरात आज सकाळी अचानक सादोबा दर्गा, माणिकबाग व नागझरी परीसरात तीन गवे आल्याने नागरीकात घबराट

पन्हाळ्यावर दिवसभर गव्यांची दहशत
पन्हाळा - लोकमत न्युज नेटवर्क पन्हाळा शहरात आज सकाळी अचानक सादोबा दर्गा, माणिकबाग व नागझरी परीसरात तीन गवे आल्याने नागरीकात घबराट पसरली
सकाळी दहा वाजता हे तीन गवे सादोबा दर्गा परीसरात आले असता नागरीकांनी त्यांना पहाण्यास एकच गर्दी केली व घबराटीचे वातावरण पसरले गर्दी मुळे हे गवे माणिक बाग परीसरातील झाडीत बसले पावनगड कडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरुन या ठिकाणि जाता येत आसलेने या ठिकाणाहुन कांही धाडसी युवक या झाडीत शिरले आसता गवे भेदरुन नागझरी कडे वळले या दरम्यान वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी या गव्यांना रेडेघाट मार्गे राक्षी जंगलात हुसकुवुन लावले
पन्हाळा शहरात गवे आल्याने आज दिवसभर घबराट आणी भितीचे वातावरण होते तर गवे पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती