शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

कोविडची लस जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी ३७ हजार ५८० डोस आज जिल्ह्यात दाखल झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी ३७ हजार ५८० डोस आज जिल्ह्यात दाखल झाले. या लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून, महापालिका क्षेत्रात ६ आणि जिल्ह्यातील ८ केंद्रांवर याचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिली.

कोविड-१९ लसीकरणाच्या अनुषंगाने मोहिमेचे नियोजन व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोविड व्हॅक्सिन लसीकरण मोहीम जिल्हा कृती दल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, या मोहिमेसाठी सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्टर्स या सर्वांचा सहभाग घ्यावा, बैठक आयोजित करावी. त्यामध्ये धर्मगुरूंना निमंत्रित करावे. तसेच सर्व लोकप्रतिनिधींना नजीकच्या केंद्रांवर शुभारंभप्रसंगी निमंत्रित करावे. महापालिका क्षेत्रात ६ आणि जिल्ह्यातील ८ अशा एकूण १४ केंद्रांवर प्रत्येकी १०० लाभार्थींप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी.

जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक उपस्थित होत्या.

--

फोटो नं १३०१२०२१-कोल-कोव्हॅक्सीन कलेक्टर बैठक

ओळ : कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोविड लसीकरण मोहीम जिल्हा कृती दल समितीची बैठक झाली. यावेळी आयुक्त कादंबरी बलकवडे, डॉ. योगेश साळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

--