वादग्रस्त प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जामिनासंदर्भात पुढील सुनावणी १७ मार्चला होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:59 IST2025-03-12T15:57:54+5:302025-03-12T15:59:28+5:30

सुनावणीसाठी कोरटकरणे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

Court grants temporary relief to controversial Prashant Koratkar Next hearing regarding bail to be held on March 17 | वादग्रस्त प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जामिनासंदर्भात पुढील सुनावणी १७ मार्चला होणार

वादग्रस्त प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जामिनासंदर्भात पुढील सुनावणी १७ मार्चला होणार

Prashant Koratkar: इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याशी फोनवर वाद घालताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणारा  नागपूरचा कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. कोरटकर याच्या जामिनासंदर्भात पुढील सुनावणी १७ मार्चला होणार असून सुनावणीसाठी कोरटकरणे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

प्रशांत कोरटकर या विकृताने इंद्रजीत सावंत यांना फोन करून अर्वाच्च भाषेचा वापर केला होता. तसंच त्याने महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांविषयीही आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी केली होती. कोरटकरच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. तसंच  त्याला अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही सर्वसामान्यांसह विविध संघटनांकडून केली जात आहे. अशातच आता कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरच्या जामिनावरील सुनावणी १७ मार्च रोजी ठेवत त्याने सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, अशी मागणी करणारा पोलिसांचा अर्ज फेटाळल्याने कोरटकर याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आवाज मॉर्फ केल्याचा दावा प्रशांत कोरटकर याच्याकडून करण्यात आला होता.
 

Web Title: Court grants temporary relief to controversial Prashant Koratkar Next hearing regarding bail to be held on March 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.